भिवंडीच्या धर्तीवर नाशिकच्या आयटी पार्कच्या प्रस्तावाला लवकरच मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2022 01:43 AM2022-03-02T01:43:05+5:302022-03-02T01:43:40+5:30

माहिती तंत्रज्ञान उद्योग म्हणजे आपले भवितव्य आहे. राज्यात ज्याप्रमाणे भिवंडीला पाचशे एकर क्षेत्रांवर आयटी पार्क मंजूर झाला आहे, त्याच धर्तीवर नााशिकमध्येही साडेतीनशे क्षेत्रांतील आयटी हबच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी (दि.१) नाशिकमध्ये केली. केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक गुंतवणूक प्रकल्पसुद्धा नाशिकला आणण्यासाठी पंतप्रधानांकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

Soon approval of Nashik's IT Park proposal on the lines of Bhiwandi | भिवंडीच्या धर्तीवर नाशिकच्या आयटी पार्कच्या प्रस्तावाला लवकरच मंजुरी

भिवंडीच्या धर्तीवर नाशिकच्या आयटी पार्कच्या प्रस्तावाला लवकरच मंजुरी

googlenewsNext
ठळक मुद्देनारायण राणे यांची घोषणा : आयटी कॉनक्लेव्ह २०२२ ला उद्योजकांचा प्रतिसाद

नाशिक : माहिती तंत्रज्ञान उद्योग म्हणजे आपले भवितव्य आहे. राज्यात ज्याप्रमाणे भिवंडीला पाचशे एकर क्षेत्रांवर आयटी पार्क मंजूर झाला आहे, त्याच धर्तीवर नााशिकमध्येही साडेतीनशे क्षेत्रांतील आयटी हबच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी मंगळवारी (दि.१) नाशिकमध्ये केली. केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक गुंतवणूक प्रकल्पसुद्धा नाशिकला आणण्यासाठी पंतप्रधानांकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

नाशिक महापालिकेच्या वतीने आडगाव शिवारात ३३५ एकर क्षेत्रांत खासगी सहभागातून आयटी पार्क साकारण्यात येणार असून अशाप्रकारे आयटी पार्कसाठी पुढाकार घेणारी नाशिक महापालिका देशातील पहिलीच महापालिका आहे. या पार्कमध्ये गुंतवणूक यावी यासाठी महापौर सतीश कुलकर्णी यांनी मंगळवारी (दि.१) हॉटेल ताजमध्ये नाशिक ‘आयटी कॉनक्लेव्ह-२०२२’ आयोजित करण्यात आले होते. या परिषदेचे उद्घाटन करताना राणे बोलत होते. यावेळी माजी मंत्री जयकुमार रावल, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, ॲड. राहुल ढिकले, उपमहापौर भिकुबाई बागुल, स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते, लक्ष्मण सावजी, विजय साने, शहराध्यक्ष गिरीश पालवे, ज्येष्ठ नेते प्रकाश पाठक, भाजप लघू उद्योग आघाडीचे प्रदीप पेशकार यांच्यासह अन्य महापालिका पदाधिकारी उपस्थित हेाते.

उद्योगांविषयी बोलताना नेहमी उद्योगपतींनी किती नफा कमवला यापेक्षा किती लोकांना राेजगार दिला, किती उत्पादन केले आणि देशाच्या आर्थिक विकास दरात किती भर घातली याकडे देखील लक्ष पुरवण्याची गरज असते. नाशिकमध्ये येणाऱ्या माहिती तंत्रज्ञान उद्योगांमुळे नाशिकचे अर्थकारण बदलेल तसेच दरडोई उत्पन्न वाढेल, असेही राणे म्हणाले.

यावेळी माजी मंत्री जयकुमार रावळ यांनी उत्तर महाराष्ट्राची राजधानी असलेले नाशिक आता आयटी हब होत असून त्यामुळे स्मार्ट नाशिक ब्रँड नाशिक बनणार असल्याचे सांगितले.

इन्फो..

राणे यांनी पालकत्व स्वीकारावे

महापालिका निवडणुकीच्या वेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक दत्तक घेतले होते. त्यानंतर नाशिकमध्ये सिटी लिंक, निओ मेट्रो असे अनेक प्रकल्प राबवण्यात आले. आता आय टी हबसाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नाशिकला दत्तक घ्यावे, असे यावेळी आमदार देवयानी फरांदे यांनी सांगितले.

इन्फो...

महापौर सतीश कुलकर्णी यांनी सांगितले की, गेल्या तीस वर्षांपासून नाशिकमध्ये आयटी उद्योग यावेत, यासाठी प्रयत्न सुरू होते. ३२ टक्के युवक हे आयटीतील नोकऱ्यांसाठी पुणे, बंगळुरू, हैदराबाद येथे जातात. आता नाशिकमध्ये आयटी पार्क सुरू हेाणार असल्याने ब्रेन ड्रेन टळेल, असेही ते म्हणाले.

नाशिक महापालिकेच्या माध्यमातून ३३५ एकर क्षेत्रांवर पार्क साकारण्यात येणार आहे. तसे संमतीपत्र नागरिकांनी महापालिकेला दिले आहे. त्यामुळे नाशिकमध्ये अर्थकारण वाढेल तसेच प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष दोन लाख रोजगार वाढतील, असे सांगितले.

Web Title: Soon approval of Nashik's IT Park proposal on the lines of Bhiwandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.