लवकरच परिपत्रक : पणन संचालकांचे सूतोवाच

By admin | Published: December 19, 2014 11:05 PM2014-12-19T23:05:14+5:302014-12-19T23:46:27+5:30

आडत बंदला व्यापाऱ्यांचा विरोध, शेतकरी संभ्रमात

Soon Circular: Marketing Director's Investigations | लवकरच परिपत्रक : पणन संचालकांचे सूतोवाच

लवकरच परिपत्रक : पणन संचालकांचे सूतोवाच

Next

नाशिक : राज्यातील सर्व बाजार समित्यांमधील शेतकऱ्यांना लावण्यात येणारी आडत पद्धत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, याबाबत दोन दिवसांत पत्रक काढण्यात येणार असल्याचे सुतोवाच पणन संचालक डॉ़ सुभाष माने यांनी केले आहे़ आडत बंद होणार असेल तर व्यापाऱ्यांनी या निर्णयाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे, तर आडत बंद झाल्यास मालास किंमत व हमी मिळेल काय, अशा संभ्रमात शेतकरी आहेत़
बाजार समित्यांसाठी उपविधी व महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनिमय) अधिनियम १९६३ मधील तरतुदींप्रमाणे बाजार समितीस कामकाज करणे बंधनकारक आहे. (पान २ वर)



बाजार समितीस लागू कायद्यातील तरतुदीनुसार आडत्या हा घटक शेतकऱ्यांचे शेतीमालाचे विक्र ीस व अनुषंगिक बाबीस जबाबदार घटक म्हणून कामकाज पाहत आहे. प्रचलित पद्धतीनुसार शेतकरी शेतीमाल बाजार समितीमध्ये विक्र ीस आणतो. त्याच्या इच्छेनुसार आडत्याची निवड करण्याचे त्याला संपूर्ण स्वातंत्र्य असते. आडत्या हा शेतकऱ्याचा माल जास्तीत जास्त भावाने लिलाव पुकारून विकणे, मोजमाप करणे आदि कामे करतो. व्यापाऱ्याकडून रक्कम नाही मिळाली तरी २४ तासांच्या आत शेतकऱ्याला मालाची रक्कम देतो, तर व्यापाऱ्यांकडून १ टक्के मार्केट फी वसूल करून बाजार समितीला देण्याचे काम आडते करत आहेत़ बदल्यात त्यांना शेतकऱ्यांकडून तीन ते साडेतीन टक्के आडत मिळते यावरच त्यांचा व्यवसाय सुरू आहे़
बाजार समित्यांनी या पद्धतीत बदल करून आडत्या या महत्त्वपूर्ण घटकास दूर केल्यास शेतकऱ्यांच्या मालाची जबाबदारी कोण घेणार? खरेदीदाराने शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास त्याला जबाबदार कोण? शेतीमालाला चांगला भाव मिळणार का? आदि प्रश्न उपस्थित झाले आहेत़ तसेच कायद्यातील तरतुदीनुसार व प्रचलित बाजार आवारात प्रत्येक घटकाची जबाबदारी निश्चित करून कामकाज सुरू आहे. यात बदल झाल्यास कायदेशीर बाबी उद्भवणार असल्याचे संचालकांचे म्हणणे आहे़
शासन आडतीला पर्यायी व्यवस्था काय करणार हे अगोदर स्पष्ट करावे़ तसेच आडत बंद केल्यानंतर आडत्यांनी शेतकऱ्यांच्या पैशाची हमी का घ्यावी, असे प्रश्न उपस्थित करत आडत बंद के ल्यास सर्व व्यापारी, आडतदार या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरतील असे व्यापारी संघटनेचे सोहन भंडारी यांनी सांगितले़

चौकट
स्वागतार्ह, परंतु हमीचे काय
शासनाचा निर्णय स्वागतार्ह आहे, परंतु बाजार समितीत आडतदार बोलीपद्धतीने मालाची विक्री करून चढ्या भावाने माल विक्री करतो़ तो स्थानिक असल्याने त्याच्या वतीने विक ल्या गेलेल्या मालाला तो जबाबदार असतो़ उद्या आडत्या नसेल तर शेतमालाला योग्य भाव मिळेल का? तसेच खरेदीदार व्यापाऱ्याच्या पैशाची हमी कोण घेणार हा प्रश्न आहे़ शासनाचा निर्णयाने शेतकऱ्यांच्या काही पैशांची बचत होईल; परंतु विक्रीच्या पैशाची हमी कोण घेणाऱ
- दत्तात्रय सोनू जमदाडे, शेतकरी, वडनेर भैरव.
...तर शेतकऱ्यांना कोणी वाली नसेल
आडत्या हा शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये होणाऱ्या व्यवहारात मध्यस्थाची भूमिका बजावतो़ त्याच्या विश्वासावरच शेतकरी आपला माल घेऊन बाजार समितीत येत असतात़ शासनाने आडत बंद केली, तर दुसरी पर्यायी यंत्रणा शासनाकडे नाही़ आडत बंद झाल्यास शेतकऱ्यांच्या पैशाची हमी कोणी घेणार नाही, तर बाहेरील व्यापारी शेतकऱ्यांची केवळ लुबाडणूक करतील़ त्यावेळी शेतकऱ्यांना कोणीही वाली नसेल़
- अनिल बूब, व्यापारी प्रतिनिधी, कृषी उत्त्पन्न बाजार समिती, नाशिक.

Web Title: Soon Circular: Marketing Director's Investigations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.