मालेगाव शहरात १५ हजार घरकुलांचे लवकरच वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 11:17 PM2020-09-04T23:17:08+5:302020-09-05T01:12:34+5:30

शहरालगतच्या म्हाळदे शिवारात लाखो रुपये खर्च करून घरकुल योजना उभारण्यात आली आहे. या योजनेतील लाभार्थींचे त्वरित स्थलांतर करावे, असे आदेश महापौर ताहेरा शेख यांनी दिले आहेत. घरकुल योजनेत सुमारे १५ हजार घरकुले लाभार्थींना वितरित करण्यात येणार आहेत.

Soon distribution of 15,000 households in Malegaon city | मालेगाव शहरात १५ हजार घरकुलांचे लवकरच वितरण

मालेगाव शहरात १५ हजार घरकुलांचे लवकरच वितरण

Next

मालेगाव : शहरालगतच्या म्हाळदे शिवारात लाखो रुपये खर्च करून घरकुल योजना उभारण्यात आली आहे. या योजनेतील लाभार्थींचे त्वरित स्थलांतर करावे, असे आदेश महापौर ताहेरा शेख यांनी दिले आहेत. घरकुल योजनेत सुमारे १५ हजार घरकुले लाभार्थींना वितरित करण्यात येणार आहेत.
घरकुलांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत महापालिकेत प्रशासनाच्या संबंधित विभाग प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक महापौरांच्या दालनात झाली. यावेळी घरकुल योजनेत सुमारे १५ हजार घरकुले लाभार्थींना वितरित करण्यात येणार आहेत. योजनेतील बहुतांशी सदनिका तयार असून, योजनेसाठी पात्र गरजू लाभार्थींना वाटप करण्यात आले नाही. परिणामी पात्र लाभार्थी अजूनही रस्त्यावर व शासकीय जागांवर अतिक्रमण व झोपडपट्टी करून राहतात. यावर तातडीने मार्ग काढण्याची सूचना महापौर शेख यांनी केली. प्रभाग स्तरावर करण्यात येणाºया आयएचडीपीचे संपूर्ण कामकाज एकत्रितरीत्या महापालिकेत मुख्यालय स्तरावर करण्यात यावे. पात्र लाभार्थींनी अंशदानासाठी सुलभ हप्त्यांचे नियोजन करावे. बैठकीला माजी आमदार व नगरसेवक रशीद शेख, उपायुक्त नितीन कापडणीस, वैभव लोंढे, संजय जाधव, कैलास बच्छाव आदी उपस्थित होते.
ज्या लाभार्थींना सदनिका मिळाली आहे त्यांना स्थलांतरित करून झोपडपट्टी निष्कासित करण्यासाठी अतिक्रमण विभागाने कारवाई करावी. अतिक्रमण काढण्यासाठी पोलीस प्रशासनाला पत्र देऊन संरक्षण घेण्यात यावे. नागछाप व राहुलनगर येथे पुन्हा झालेले अतिक्रमण हटविण्यात यावे. यासह विविध सूचना शेख यांनी केल्या.

Web Title: Soon distribution of 15,000 households in Malegaon city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Homeघर