ग्रामपंचायत निवडणूक आरक्षण जाहीर होताच राजकीय हालचालींना आला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2020 06:00 PM2020-02-11T18:00:58+5:302020-02-11T18:01:15+5:30

ब्राह्मणगाव : येथे विशेष ग्रामसभा संपन्न होऊन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभाग निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

As soon as the Gram Panchayat election reservation was announced, the political movements started gaining momentum | ग्रामपंचायत निवडणूक आरक्षण जाहीर होताच राजकीय हालचालींना आला वेग

ग्रामपंचायत निवडणूक आरक्षण जाहीर होताच राजकीय हालचालींना आला वेग

googlenewsNext

ब्राह्मणगाव : येथे विशेष ग्रामसभा संपन्न होऊन ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रभाग निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. सहा वॉर्डात अनुसूचित जाती -२, अनुसूचित जमाती - ५, ओबीसी व सर्वसाधारण - १० अशा एकूण १७ जागांसाठी व एकूण सहा वॉर्डासाठी हे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय चर्चा व उमेदवार चाचपणी सुरू झाली असून सरपंचपद हे राखीव असण्याच्या शक्यतेने उपसरपंचपदासाठी ही निवडणूक लक्षवेधी ठरणार असल्याने त्यासाठी वॉर्ड पाच मध्ये उमेदवारांची संख्या वाढणार असून सर्व लक्ष हे वार्ड नंबर पाचवर केंद्रित होणार आहे.
वार्ड पाच मध्ये मागासवर्ग एक पुरु ष, एक स्त्री तसेच एक सर्वसाधारण पुरु ष अशी आरक्षण आहे. उमेदवारांनी आतापासूनच भेटीगाठी घेऊन चाचपणी सुरू केली आहे. या निवडणुकीत आज फक्त व्यक्तीगत भेटीगाठी चालू असून उमेदवारांची चाचपणी होऊन मग लढत निश्चित होणार आहे. तर या वॉर्डाची निवडणूक प्रतिष्ठेची केली जाणार आहे.
सन. २०२०-२०२५ साठी ग्रामपंचायतीची निवडणूक आता तोंडावर आली असून त्यासाठी प्रभाग निहाय आरक्षण असे प्रभाग - १ मध्ये सर्वसाधारण पुरु ष १, अनुसूचित जमाती स्त्री १, सर्वसाधारण स्त्री १, एकूण जागा - ३. प्रभाग - २ मध्ये अनुसूचित जमाती- पुरु ष १, अनुसूचित जमाती स्त्री १, इतर मागास वर्ग स्त्री १, एकूण - ३. प्रभाग - ३ मध्ये - सर्व साधारण पुरु ष -१, सर्वसाधारण स्त्री--१ एकूण - २. प्रभाग - ४ मध्ये अनुसूचित जमाती पुरु ष १, इतर मागास वर्ग पुरु ष १, अनुसूचित जमाती स्त्री १, एकूण - ३. प्रभाग - ५ इतर मागास वर्ग पुरु ष १, सर्व साधारण पुरु ष १, इतर मागास वर्ग स्त्री १, एकूण - ३.
प्रभाग - ६ अनुसूचित जाती पुरु ष १, अनुसूचित जाती स्त्री १, इतर मागास वर्ग स्त्री एकूण - ३. या प्रकारे सहा प्रभागामध्ये १७ जागांसाठी हे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
निवडणूक आरक्षण जाहीर झाल्यानंतर राजकीय चर्चेला सुरुवात झाली असून हे आरक्षण पाहता वॉर्ड पाच हे निवडणुकीचे केंद्र बिंदू राहणार असून उमेदवारांची संख्याही या वर्डात जास्त राहून निवडून प्रतिष्ठेची केली जाणार आहे.

 

Web Title: As soon as the Gram Panchayat election reservation was announced, the political movements started gaining momentum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.