अनलॉक होताच अपघात विभागात वाढली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:18 AM2021-08-19T04:18:38+5:302021-08-19T04:18:38+5:30
अपघातांच्या प्रमाणात वाढ होण्यामागे सर्वाधिक मोठे कारण अती घाई हेच ठरलेले आहे. विशेषत्वे दुचाकी चालकांबाबत तर शहराच्या परिघात तसेच ...
अपघातांच्या प्रमाणात वाढ होण्यामागे सर्वाधिक मोठे कारण अती घाई हेच ठरलेले आहे. विशेषत्वे दुचाकी चालकांबाबत तर शहराच्या परिघात तसेच महामार्गांवरुन जातानाही वेग आणि अती घाईच अपघातास कारणीभूत ठरली आहे. त्याशिवाय चारचाकी वाहने ही पावसाळ्यात व्हिजिबिलिटी चांगली नसल्याने कुणाचे वायपर बंद पडल्याने तर काहींची चाके स्कीड झाल्याने घसरल्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्याशिवाय निर्धारित ठिकाणी किंवा कार्यालयात पोहोचण्यास घरातून किंवा कार्यालयातूनच निघण्यास उशीर झाल्याने वेळेवर पोहोचण्यासाठीच्या कसरतीत अपघातांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
इन्फो
दारुची उपलब्धता देखील कारण
जिल्ह्यात कोरोनाचे निर्बंध लागू असताना दारु दुकाने देखील प्रदीर्घ काळ बंद होती. त्यामुळे दारु मिळण्याचे स्त्रोतच आटले होते. तर काही जण तशाही परिस्थितीत दारु मिळवत असले तरी दारुची उपलब्धता कमी असल्याने दारु पिण्याचे प्रमाण देखील कमी होते.
निर्बंध शिथिल झाल्यानंतर मात्र दारु बाजांना मुबलक दारु उपलब्ध झाली. काहींनी तर पुढील महिना, दोन महिने पुरेल असा स्टॉक करुन घेतल्याने दारु पिण्याचे प्रमाणदेखील वाढले असल्याने एकूणातच वाहनचालकांच्या अपघातात या दारु सेवनाचाही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.