संभाजी स्टेडीयम, ठक्कर डोम येथे लवकरच कोविड सेंटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:15 AM2021-04-04T04:15:34+5:302021-04-04T04:15:34+5:30
नाशिक- सिडकोतील संभाजी स्टेडियम व त्र्यंबकरोडवरील ठक्कर डोम येथे कोविड सेंटर पुन्हा कार्यान्वित करावे लागणार असून त्या दृष्टीने आयुक्त ...
नाशिक- सिडकोतील संभाजी स्टेडियम व त्र्यंबकरोडवरील ठक्कर डोम येथे कोविड सेंटर पुन्हा कार्यान्वित करावे लागणार असून त्या दृष्टीने आयुक्त कैलास जाधव यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून त्या ठिकाणी विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना शनिवारी (दि. ३) विभाग प्रमुखांना दिल्या.
नाशिक महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून या पार्श्वभूमीवर शहरातील रुग्णांना बेडची संख्या अपुरी पडू नये या दृष्टीने मनपाच्या वतीने युद्धपातळीवर कामकाज सुरू असून त्यामध्ये कोरोना कक्षाच्या संख्येत वाढ करून त्यात बेडची संख्या वाढवण्याच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात आहेत.या पार्श्वभूमीवर नवीन नाशिक संभाजी स्टेडियमच्या जागेत सुमारे २०० रुग्णांची व्यवस्था होईल असे नियोजन करण्यात येत आहे. या कामास गती देऊन तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या. तसेच ठक्कर डोम येथील कोरोना कक्ष त्वरित सुरू होईल या दृष्टीने पाहणी करून क्रेडाई चे अध्यक्ष रवि महाजन, पदाधिकारी सचिन बागड, कृणाल पाटील व अनिल आहेर यांच्याशी जाधव यांनी चर्चा केली.यावेळी उपायुक्त मनोज घोडे पाटील, नगर रचना विभागाचे सहायक संचालक अंकुश सोनकांबळे, अधीक्षक अभियंता संदीप नलावडे, शिवाजी चव्हाणके, कार्यकारी अभियंता राजू आहेर, घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या संचालिका डॉ. कल्पना कुटे, विभागीय अधिकारी मयुर पाटील व आदी अधिकारी उपस्थित होते.
===Photopath===
030421\03nsk_38_03042021_13.jpg
===Caption===
सिडकोतील संभाजी स्टेडीयम येथे नियोजीत कोविड सेंटरची पाहणी करताना महापालिका आयुक्त कैलास जाधव, समवेत अन्य अधिकारी.