रेशनमध्ये लवकरच तूरडाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2019 12:51 AM2019-12-13T00:51:18+5:302019-12-13T00:53:05+5:30

बाजारात तूरडाळीचे दर शंभर रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने सर्वसामान्यांना स्वस्तदरात तूरडाळ उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे नोंदविलेली ७२० क्विंटल तूरडाळ येत्या दोन दिवसांत जिल्ह्णात दाखल होणार असून, रेशनमधून कार्डधारकांना स्वस्तदरात डाळ उपलब्ध होणार आहे.

Soon to rally | रेशनमध्ये लवकरच तूरडाळ

रेशनमध्ये लवकरच तूरडाळ

Next
ठळक मुद्देजिल्हा पुरवठा विभाग: ७२० क्विंटल डाळ दोन दिवसांत पोहोचणार

नाशिक : बाजारात तूरडाळीचे दर शंभर रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने सर्वसामान्यांना स्वस्तदरात तूरडाळ उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने शासनाकडे नोंदविलेली ७२० क्विंटल तूरडाळ येत्या दोन दिवसांत जिल्ह्णात दाखल होणार असून, रेशनमधून कार्डधारकांना स्वस्तदरात डाळ उपलब्ध होणार आहे.
तूरडाळींच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ झाल्याने सर्वसामान्यांना तूरडाळ खरेदी करणे अशक्य झाल्याने जिल्हा पुरवठा विभागाने रेशनद्वारे सर्वसामान्यांना स्वस्त दरात डाळ खरेदी करता यावी यासाठी शासनाकडे ७२० क्विंटल तूरडाळीची मागणी केली आहे. येत्या दोन दिवसात पुरवठा विभागाला सदर डाळ प्राप्त होणार असून, रेशन दुकानांमधून तूरडाळ ५५ रु पये प्रतिकिलो दराने दिली जाणार आहे. ग्राहकांना बाजारभावापेक्षा कमी दराने डाळ मिळावी यासाठी रेशनदुकानारांना डाळीची मागणी नोंदविण्याबाबत कळविण्यात आले आहे. अवकाळी पावसामुळे कडधान्यांचे नुकसान झाले. काढणीची पिकेही वाहून गेली. याचा फटका डाळींच्या पुरवठ्यावर झाल्यामुळे नवीन डाळ बाजारात येऊ शकली नाही त्यामुळे बाजारपेठेत डाळीचा तुटवडा निर्माण झाला.
मराठवाडा व विदर्भात कडधान्याची पिके घेतली जातात, परंतु परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याने तेथून येणारी डाळही वेळेत येऊ शकली नाही. राजस्थान व मध्य प्रदेश या राज्यातूनदेखील डाळींचा पुरवठा होतो. मात्र, यंदा सर्वत्र कडधान्याचे क्षेत्र घटल्यामुळे डाळींचा भाव वधारला आहे. दुकानांमध्ये उडीद १२०, तर मूगडाळ ११० रु पये किलो दराने विक्र ी केली जात आहे. दुसरीकडे या डाळींना मागणी वाढली असून, पुरवठा घटला आहे. तूरडाळ, मूगडाळ, हरबरा डाळ, उडीद, मूग आदींच्या किमतीनी प्रति किलो शंभरी पार केली आहे. डाळीच्या किमती कमी न झाल्यास सर्वसामान्यांना डाळ खरेदी करणे मुश्किल झाले आहे. याचमुळे कार्डधारकांना वाजवी दरात तूरडाळ मिळावी यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने ७२० क्विंटल तूरडाळीची मागणी नोंदवली होती. मागील नोव्हेंबर महिन्यात ही मागणी करण्यात आली असून, येत्या दोन दिवसांत तूरडाळ डाळ प्राप्त होणार आहे.
तूरडाळीला उठाव नसल्यामुळे रेशनदुकानदारांकडून तूरडाळीची मागणी नोंदविली जात नसल्याचे पुरवठा विभागाकडून सांगितले जात असताना दुसरीकडे ग्राहक मात्र तुरडाळ मिळत नसल्याची तक्रार करीत आहेत, तर मागणी नोंदवूनही तूरडाळ प्राप्त होत नसल्याचे रेशनदुकानदारंचे म्हणणे आहे. त्यामुळे दिवाळीपासून तूरडाळीचा पुरवठा अनिश्चित झाला आहे. आता घाऊक बाजारात तुरडाळींचे भाव शंभरच्या पुढे गेल्याने आता रेशनदुकानातून तूरडाळ प्राप्त होणार आहे. यासाठी पुरवठा विभाग गंभीर असून, रेशनदुकानदारांच्या मागणीकडे लक्ष ठेवणार आहेत.

Web Title: Soon to rally

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.