निर्बंध शिथिल होताच दुचाकीस्वार जोरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:15 AM2021-05-25T04:15:44+5:302021-05-25T04:15:44+5:30
टाकी रस्त्यावर खोदकाम नाशिक : जेलरोड येथील मार्गावर गॅस पाइपलाइनसाठी खोदकाम करण्यात आल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर दगडमातीने तात्पुरती ...
टाकी रस्त्यावर खोदकाम
नाशिक : जेलरोड येथील मार्गावर गॅस पाइपलाइनसाठी खोदकाम करण्यात आल्याने अनेक ठिकाणी रस्त्यावर दगडमातीने तात्पुरती डागडुजी करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या पावसाच्या शिडकाव्यामुळे खड्डे वाढले आहेत. या मार्गावरील खोदकामाच्या ठिकाणी तत्काळ डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी होत आहे.
रेशनदुकानांसमोर कार्डधारकांच्या रांगा
नाशिक : शासनाकडून देण्यात येणारे मोफत धान्य वितरण रेशनदुकानांच्या माध्यमातून केले जात आहे. धान्य घेण्यासाठी कार्डधारकांच्या दुकानांसमेार रांगा लागत आहेत. धान्याच्या दर्जाबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या असून, डाळ मिळत नसल्याची तक्रारदेखील केली जात आहे.
हातगाडीवर दुकाने थाटून व्यवसाय
नाशिक : जीवनाश्यक वस्तुंची दुकाने सुरू ठेवण्यासच केवळ परवानगी असताना इतर दुकानदारांनी हातगाडीवर वस्तू विक्री सुरू केली आहे. क्रॉकरी, प्लॅस्टिकच्या वस्तू, बेकरी उत्पादने, स्नॅक्सची पाकिटे, गॅरेज असे व्यवसाय आता रस्त्यावरच सुरू झाले आहेत. दुकाने बंद ठेवणे परवडत नसल्याने दैनंदिन गरज भागविण्यासाठी अशा प्रकारची दुकाने थाटली आहेत.
जेलरोड चौकातील बॅरिकेड्स हटविण्याची मागणी
नाशिक : लोखंडेमळा ते जेलरोड येथील मार्गावरील इंदिरा गांधी चौकात पोलिसांनी बॅरिकेड्स टाकले आहेत. याच मार्गावरील टाकळी लिंकरोडवरील बॅरिकेड्स काढण्यात आले आहेत त्यामुळे सदर रस्ता सुरळीत सुरू असताना नारायण बापूनगरातील बॅरिकेड्स कायम असल्याने या मार्गाने येणाऱ्यांना वळसा घालून जेलरोड टाकीकडे जावे लागते.
जेलरोड चौकात आंबेविक्री जोरात
नाशिक : जेलरोडवरील सैलानी बाबा चौकातून राजराजेश्वरी मार्गाकडे जाणाऱ्या मार्गावर आंबेविक्री जोरात सुरू आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात आंबे विक्री करणारे विक्रेते बसत आहेत. याच मार्गावर आता फळविक्रेत्यांची संख्या वाढू लागली आहे.