गोदावरीतील १७ प्राचीन कुंडांचे लवकरच पुनरूज्जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 03:04 PM2019-11-07T15:04:53+5:302019-11-07T15:10:34+5:30
पंचवटी : श्री गोदावरी नदीपात्र कॉँक्रिटीकरणमुक्त करून तब्बल १७ प्राचीन कुंड पुनर्जीवित करण्याबाबत गेल्या तीन महिन्यांपुर्वी डॉ. प्राजक्ता बस्ते यांनी तयार केलेले तांत्रिक अहवाल नाशिक स्मार्ट सिटी कंपनीचे सीइओ आणि मनपा आयुक्तांना सुपूर्द करण्यात आलेला होता त्याची प्रशासनाने दखल घेऊन गोदावरी नदीपात्रातील कुंडाची वर्तमान स्थिती, कॉँक्रिटचा थर याबाबत स्मार्ट सिटीच्या गोदा प्रोजक्ट अंतर्गत सर्व्हेक्षणाला गुरूवारी (दि.७) प्रारंभ करण्यात आला.
पंचवटी : श्री गोदावरी नदीपात्र कॉँक्रिटीकरणमुक्त करून तब्बल १७ प्राचीन कुंड पुनर्जीवित करण्याबाबत गेल्या तीन महिन्यांपुर्वी डॉ. प्राजक्ता बस्ते यांनी तयार केलेले तांत्रिक अहवाल नाशिकस्मार्ट सिटी कंपनीचे सीइओ आणि मनपा आयुक्तांना सुपूर्द करण्यात आलेला होता त्याची प्रशासनाने दखल घेऊन गोदावरी नदीपात्रातील कुंडाची वर्तमान स्थिती, कॉँक्रिटचा थर याबाबत स्मार्ट सिटीच्या गोदा प्रोजक्ट अंतर्गत सर्व्हेक्षणाला गुरूवारी (दि.७) प्रारंभ करण्यात आला.
इ.स.१७०० च्या आसपास महापुरूषांच्या योगदानातून गोदावरी नदीपात्रात साकारले गेलेले जवळपास १७ प्राचीन कुंड कॉँक्रिटीकरणमुक्त करून मूळ स्वरूपात पुनजिर्वीत करण्या संबंधीच्या टेक्नीकल रिपोर्ट आक्टिेक्ट प्राजक्ता बस्ते आणि याचिकेकर्ते देवांग जानी यांनी नाशिक महापालिकेच्या स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पाेरेशन लिमीटेडचे सीइओ प्रकाश थविल आणि महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासमोर सादर केले होते त्याची सकारात्मक दखल घेतली. नाशिक स्मार्ट सिटीच्या गोदा प्रोजेक्ट अंतर्गत सदरचे १७ प्राचीन कुंड पुनजिर्वीत करण्यासाठी सर्वेअरमार्फत कुंडांची लांबी, रूंदी, आकर तसेच कुंडांची वर्तमान स्थिती यावर आधारित सर्व्हेचा शुभारंभ करण्यात आला.
आगामी कालावधीत नदीपात्रात कोर कटिंग करून नदीपात्रातील कॉँक्रिटच्या थराचे मोजमाप घेतले जाईल व १७ कुंडांच्या वर्तमान परिस्थिचा नकाशा तयार झाल्यानंतर १९९७ तील डीएलआर नकाशानुसार जुळवणी करून येत्या काळात १७ प्राचीन कुंड मूळ स्वरूपात पुनजिर्वीत करण्याच्या प्रत्यक्ष प्रक्रियेला सुरूवात केली जाणार आहे. या सर्व्हेक्षण शुभारंभाप्रसंगी याचिकाकर्ते देवांग जानी, आर्किटेक्ट प्राजक्ता बस्ते, स्मार्ट सिटीचे सय्यद आदिंसह अधिकारी उपस्थित होते.