प्रदेशाध्यक्षांची पाठ फिरताच भाजपात उफाळली गटबाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:12 AM2021-07-20T04:12:09+5:302021-07-20T04:12:09+5:30

या प्रभाग समितीत शिवसेनेसह महाआघाडीचे ११ आणि भाजपाचेही तितकेच संख्याबळ सध्या आहे. त्यामुळे समसमान मतदान होईल अशी शक्यता असल्याने ...

As soon as the state president turned his back on the BJP, factionalism erupted | प्रदेशाध्यक्षांची पाठ फिरताच भाजपात उफाळली गटबाजी

प्रदेशाध्यक्षांची पाठ फिरताच भाजपात उफाळली गटबाजी

Next

या प्रभाग समितीत शिवसेनेसह महाआघाडीचे ११ आणि भाजपाचेही तितकेच संख्याबळ सध्या आहे. त्यामुळे समसमान मतदान होईल अशी शक्यता असल्याने चिठ्ठी पध्दतीवर फैसला होईल असे सांगितले जात होते. मात्र, प्रत्यक्षात भाजपाच्या डॉ. सीमा ताजणे तसेच विशाल संगमनेरे यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग न घेतल्याने दिवे यांचा विजय सुकर झाला. दिवे यांना ११ तर हांडगे यांना ९ मते मिळाली.

जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाईन निवडणुकीसाठी सेनेचे आणि भाजपचे बहुतांश सदस्य हजर होते. सेनेचे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते आणि गटनेते विलास शिंदे तळ ठोकून होते. विजय मिळताच शिवसेनेने जल्लेाष केला.

महापालिकेच्या निवडणुका अवघ्या सहा महिन्यांवर आहेत. त्यामुळे भाजपची गटबाजी थोपवण्याचे मोठे आव्हान पक्षश्रेष्ठींसमेार आहे. त्यामुळे गेल्या शुक्रवारी (दि. १६) भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील नाशिकमध्ये दाखल झाले. त्यांनी पक्ष कार्यालयात तर सर्व गटतटांना मन मोकळे करण्याची संधी दिलीच परंतु आमदार ढिकले व माजी आामदार सानप यांच्या निवासस्थानीही भेटी दिल्या. मात्र, त्यांची पाठ फिरताच भाजपात गटबाजी पुन्हा उफाळून आली.

नाशिकरोड प्रभाग समिती सभापतीपदासाठी शिवसेनेच्या वतीने प्रशांत दिवे आणि भाजपाच्या वतीने मीरा हांडगे तसेच सुमन सातभाई यांन. अर्ज दा‌खल केले होते. त्यातील सातभाई या सानप तर हांडगे या ढिकले गटाच्या ओळखल्या जातात. यातील हांडगे यांन. उमेदवारी दिल्याने सातभाई यांन. माघार घेतली. मात्र, अन्य दोघांमुळे भाजपला पराभवाला सामाेरे जावे लागले.

...इन्फो...

सानपांवर ब्लेम, त्या दाेघांना नोटिसा काढणार!

या निवडणुकीनंतर भाजपात ब्लेम गेम सुरू झाला आहे. ज्या ठिकाणी मतदान शक्य आहे, त्यावेळी किमान पक्षादेश बजावणे आवश्यक असताना पक्षादेशदेखील बजावण्यात आलेला नाही. मात्र आता या दोन्ही नगरसेवकांना कारणे दाखवा नोटिसा बाजवण्यात येणार असल्याची माहिती भाजपा शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी दिली. बाळासाहेब सानप हे डॉ. सीमा ताजणे तसेच संगमनेरे यांच्याशी चर्चा करीत असल्याने व्हीप काढला नव्हता, असे पालवे यांनी सांगितले.

इन्फो...

सानप म्हणतात, मी कशाला गद्दारी करील?

बाळासाहेब सानप यांनी गटबाजी केल्याचा इन्कार केला आहे. महापालिका निवडणुकीत मीच या सर्वांना उमेदवारी दिली असल्याने जवळचे लांबचे असा प्रकार नाही. नाशिकरोडच्या नगरसेवकांशी बोलण्यासाठी मला सकाळी ११ वाजता सांगण्यात आले. सुमन सातभाई, कोमल मेहरोलिया या सर्वंशी चर्चा करून मीच त्यांना निवडणुकीला पाठवले. डॉ. सीमा ताजणे या अनेक दिवसांपासून संपर्क क्षेत्राबाहेर आहेत. विशाल संगमनेरे मुंबईला होते. नाशिकला पाहोचतो असेही त्यांनी सांगितले होते परंतु नंतर ते संपर्कात नाहीत. आता दोघांवर कारवाई करण्यासाठी मीच पक्षाला सांगितले आहे, असेही सानप म्हणाले.

Web Title: As soon as the state president turned his back on the BJP, factionalism erupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.