ज्वारीची श्रीमंती वाढली; गव्हापेक्षाही जास्त भाव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:18 AM2021-07-14T04:18:03+5:302021-07-14T04:18:03+5:30
अशी वाढली ज्वारीची श्रीमंती (प्रतिक्विंटल दर) वर्ष ...
अशी वाढली ज्वारीची श्रीमंती (प्रतिक्विंटल दर)
वर्ष ज्वारी गहू
१९८० ------ ------
१९९० -------- -------
२००० ------- --------
२०१० ----------- -------
२०२० -------- ------
२०२१ २,६४० १,९७५
चौकट-
भाकरीच परवडायची म्हणून खायचो
कोट-
पूर्वी आमच्या शेतात ज्वारीचे उत्पादन भरपूर व्हायचे. गावाकडचे मोठे कुटुंब. गहू घेणे परवडणारे नव्हते म्हणून आमच्या घरी दोन्हीही वेळी ज्वारीच्या भाकरीच व्हायच्या. सकाळी एकदा न्याहारी केली, तर दिवसभर काही खाण्याची गरज पडत नव्हती. दिवाळी दसऱ्यालाच झाल्या तर गव्हाच्या पुरणपोळ्या व्हायच्या.
-बाबूराव डमाळे, ज्येष्ठ नागरिक
कोट-
त्याकाळी घरातील महिलांना सकाळी उठून रानात जावे लागायचे. त्यापूर्वी सकाळचा स्वयंपाकही उरकावा लागायचा. यामुळे गव्हाच्या चपात्या लाटत बसण्यास घरातील महिलांना वेळ मिळायचा नाही. शिवाय त्याकाळी ज्वारी स्वस्त मिळायची. भाकरीबरोबर मिरचीचा साधा ठेचा घेतला तरी पोटभर जेवण व्हायचे.
-दिनकर पगारे, ज्येष्ठ नागरिक
चौकट-
आता चपातीच परवडते
कोट-
ज्वारी ३० ते ३५ रुपये किलो, तर गहू २० ते २५ रुपये किलो. याशिवाय रेशन दुकानावरही अल्प दरात गहू मिळत असल्याने घरात गहू खाणेच परवडते. वर्षभराचे धान्य भरून ठेवले, तर नंतर त्याची चिंता करावी लागत नाही. ज्वारी एकाचवेळी घेणेही परवडणारे नाही.
-राजेंद्र गरुड
कोट-
ज्वारीची भाकर खाणे आरोग्यास चांगले असले तरी आजच्या महागाईच्या जमान्यात ते परवडणारे नाही. घरातील सर्व खर्च आणि धान्य खरेदी यांचा मेळ बसविताना गहू घेणे आमच्यासारख्यांना परवडणारे आहे. त्यामुळे आम्ही गव्हालाचा प्राधान्य देतो.
-हेमंत ठेंगे
चौकट-
आरोग्याची श्रीमंतीही ज्वारीतच
चौकट-
जिल्ह्यात ज्वारीचे उत्पादन घटले
पूर्वी खरिपात ज्वारीचा पेरा मोठ्या प्रमाणात होत होता. अनेक गावांच्या शिवारात ज्वारीची पिके डोलताना दिसत होती. मात्र, मका, सोयाबीनसारख्या नगदी पिकांकडे शेतकरी वळाल्याने ज्वारीचा पेरा खूपच कमी झाला आहे. जिल्ह्यातील काही भागांतच आता ज्वारी होत असून, त्यांची संख्याही अल्प प्रमाणात आहे. यामुळे ज्वारीची आवक खूपच कमी झाल्याने ज्वारीला हमी भावाबरोबरच खुल्या बाजारातही चांगला दर मिळत आहे.