शिवमंदिरांमध्ये बम बम भोलेचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 11:48 PM2020-02-21T23:48:37+5:302020-02-22T01:18:53+5:30

नाशिक : महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यातील विविध मंदिरांमध्ये भाविकांनी बम बम भोलेचा गजर केला़ चांदवड येथील चंद्रेश्वर गडावर महाशिवरात्रीनिमित्त पालखी तर मनमाडला कावडी मिरवणूक काढण्यात आली़

The sound of a bomb blast in Shiva temples | शिवमंदिरांमध्ये बम बम भोलेचा गजर

मनमाड येथे महाशिवरात्र उत्सव समितीच्या वतीने काढण्यात आलेली कावड मिरवणूक़

Next
ठळक मुद्देचांदवडला पालखी : मनमाडला कावडी मिरवणूक; कळवणला संगमेश्वर मंदिरात पूजा

नाशिक : महाशिवरात्रीनिमित्त जिल्ह्यातील विविध मंदिरांमध्ये भाविकांनी बम बम भोलेचा गजर केला़ चांदवड येथील चंद्रेश्वर गडावर महाशिवरात्रीनिमित्त पालखी तर मनमाडला कावडी मिरवणूक काढण्यात आली़
चंद्रेश्वर गडावर महोत्सव
चांदवड येथील श्री चंद्रेश्वर गडावर महाशिवरात्र महोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले. मिरवणुकीत कलशधारी महिला, भजनी मंडळ, बॅण्डपथक, भगवे ध्वज घेतलेले भक्त मंडळाचे कार्यकर्ते होते. सुवासिनींनी पालखीची व स्वामी जयदेवपुरी महाराज यांचे पूजन केले. पालखीत श्री चंद्रेश्वर भगवानाची चांदीची मूर्ती ठेवण्यात आली होती. श्री चंद्रेश्वर महादेव भगवानला रुद्र अभिषेक, सप्तऋषी समाधी पूजन, सायंकाळी सामुदायिक भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. मधुकर महाराज जाधव (जोपूळ) यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला. यावेळी स्वामी बन्सीपुरी स्वामी जयदेवपुरी स्वामी, गंगापुरी, महंत उत्तमगिरी, महंत प्रभातपुरी आदी उपस्थित होते़. येथील कार्तिकेश्वर महादेव मंदिर, शनि मंदिर येथे पहाटे श्रींचा अभिषेक, सकाळी फराळ वाटप आदींसह विविध धार्मिक संपन्न झाले. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. येथील वरच्या गावातील मुरडेश्वर महादेव मंदिरात भविकांना त्रिलोक मंडळ यांच्या वतीने उसाचा रस वाटप करण्यात आला. या निमित्त अभिषेक महापूजा करण्यात आली. असंख्य भाविकांनी गर्दी केली होती.
महाशिवरात्रीनिमित्त हरिनाम सप्ताह
मांडवड : येथील मंडपेश्वर या मंदिरात भाविकांनी महाशिवरात्री-निमित्त हरिनाम सप्ताह
समाप्तीचा कार्यक्रम झाला. श्रीराम वनवासात असताना या ठिकाणाहून मार्गक्रमण करताना मांडवड येथील मंडपेश्वराचे शिवलिंगाचे दर्शन घेतल्याचे सांगितले जाते. असा पौराणिक वारसा लाभलेल्या व मंडपेश्वर ऋषींच्या तपश्चर्येला प्रभू श्रीराम प्रसन्न झाले, असेही सांगण्यात येते.या मंदिर प्रांगणात गेल्या ३३ वर्षांपासून शिवरात्रीच्या अगोदर सात दिवसांपासून हरिनाम सप्ताहाचे ह.भ.प. गोटीराम महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन केले जाते. यामध्ये दररोज सायंकाळी प्रवचन व रात्री कीर्तन व पहाटे काकड आरती असे सात दिवस भरगच्च असे भक्तिमय कार्यक्र म झाले.

पाळे, रामनगर, मानूर येथील मंदिरांत पूजन
कळवण : तालुक्यात हेमांडपती शिवमंदिर असलेल्या मार्कण्डपिंप्री, देवळीकराड तसेच जागृत देवस्थान असलेले पाळे, रामनगर, कळवण, मानूर, सिद्धेश्वर व शिरसमणी येथील काशीविश्वेश्वर महादेव मंदिरात शिवभक्तांनी दर्शन घेत पूजन केले. शिरसमणी येथे काशीविश्वेश्वर महादेव मंदिर, शिरसमणी व सिद्धेश्वर, मार्कण्डपिंप्री येथे यात्रोत्सव भरला. मार्कण्डपिंप्री येथील श्री भुवनेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्र म झाले़ शिरसमणी गावातून संत जनार्दन स्वामी महाराज पालखी मिरवणूक काढण्यात आली. ओतूर येथील काशीविश्वेश्वर महादेव मंदिरात भक्तांनी दर्शनासाठी गर्दी केली.
संगमेश्वर महादेव मंदिर
कळवण : शहरातील बेहडी व गिरणा नदीच्या संगमावर असलेल्या संगमेश्वर महादेव मंदिरात मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक राजाराम पाटील व विश्वस्तांनी शिवभक्तांचे स्वागत केले. महाअभिषेकासह महापूजा, नवस आदी कार्यक्र म
संपन्न झाले़

नागेश्वर मंदिरात यात्रा
मनमाड : शहरातील संगमेश्वर महादेव मंदिर नागापूर येथील नागेश्वर मंदिरात यात्रा संपन्न झाली़ गांधी चौक गवळीवाडा येथून कावडींची मिरवणूक काढण्यात आली. यात्रेनिमित्त करमणुकीच्या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले
होते. चांदवड रोडवरील सगळे मळ्यातील महादेव मंदिरात तसेच मनमाड - येवला रोडवर कॅम्प विभागातील श्री
महादेव मंदिरात विविध कार्यक्रम झाले.

जोरणला कपालेश्वर मंदिरात यात्रा
जोरण : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील श्रीक्षेत्र कपालेश्वर मंदिर. या मंदिर परिसरात शिवरात्रीनिमित्त विद्युत रोषणाई करण्यात आली होती. रात्री महाप्रसाद व कीर्तनाचा कार्यक्र म कपालेश्वर देवस्थानमार्फत ठेवण्यात येतो. यावेळी गैरप्रकार घडू नये यासाठी सटाणा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सटाणा पोलीस ठाणेअंतर्गत डांगसौंदाणे बीटचे पीएसआय राहुल गवई, पोलीस हवालदार कैलास खैरनार, पोलीस कर्मचारी सागर चौधरी, राहुल शिरसाठ यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Web Title: The sound of a bomb blast in Shiva temples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.