शिवमंदिरांमध्ये बम बम भोलेचा गजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2020 11:41 PM2020-02-21T23:41:14+5:302020-02-22T01:20:12+5:30

महाशिवरात्रीनिमित्त परिसरातील मंदिरांमध्ये भाविकांनी बम बम भोलेचा गजर केला़ झोडगे येथील हेमाडपंती मंदिरात यात्रोत्सव झाला़ महादेव घाटावरील शिवमंदिरात भाविकांनी दर्शन घेतले़ संगमेश्वर परिसरात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.

The sound of a bomb blast in Shiva temples | शिवमंदिरांमध्ये बम बम भोलेचा गजर

मालेगाव येथील महादेव घाटावरील शिवमंदिरात दर्शनासाठी भाविकांनी केलेली गर्दी.

googlenewsNext
ठळक मुद्देमहाशिवरात्री : मालेगाव कॅम्प येथील मंदिरात पूजा; संगमेश्वर येथील मंदिरात अभिषेक

मालेगाव : महाशिवरात्रीनिमित्त परिसरातील मंदिरांमध्ये भाविकांनी बम बम भोलेचा गजर केला़ झोडगे येथील हेमाडपंती मंदिरात यात्रोत्सव झाला़ महादेव घाटावरील शिवमंदिरात भाविकांनी दर्शन घेतले़ संगमेश्वर परिसरात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले होते.
महादेव घाटावरील पुरातन राजेबहाद्दर यांच्या मंदिरात महादेव सेवा समितीने पहाटेपासूनच मंदिर भाविकांसाठी खुले केले होते. दिवसभर येथे भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. सकाळी ६ वाजता व रात्री ८ वाजता तसेच सायंकाळी ७ वाजता प्रमुख मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात आली. आस्था महिला भजनी मंडळ, भावसार भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. सामुदायिक शिवस्तुती पठण व सामुदायिक भजनात कार्यकर्ते सहभागी झाले होते. महादेव सेवा समितीचे अध्यक्ष पंकज मुंदडा, उत्सव प्रमुख प्रवीण बच्छाव, उपप्रमुख रमेश मंडाळे, महादू मंडाळे, राजेश वाजपेयी, संतोष जाधव, कैलास सोनवणे, कृष्णा पाटील, गणेश फुलदेवरे आणि कार्यकर्त्यांनी कार्यक्रमासाठी प्रयत्न केले. शिवलीलामृत पारायणाचा कार्यक्रम दुपारी झाला. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई, भगवे झेंडे, पताका लावण्यात आल्या होत्या. भाविकांनी मनोभावे शंकराची पूजा केली. कॅम्पातील आपला दवाखानाच्या वतीने यावेळी रक्तदान शिबिर घेण्यात आले.
येथील सर्व मंदिरासह मोसमनदी जवळील घाटावर असलेल्या पुरातन महादेव मंदिरात महाशिवरात्री- निमित्ताने मंदिर परिसरात विद्युत रोषणाई व सजावट करण्यात आली होती. भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी लोखंडी जाळी, सीसीटीव्ही यंत्रणा लावण्यात आली आहे. स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते. मंदिरात धार्मिक विधीसह राजस्थानी भजनी मंडळ, महिला भजनी मंडळाचे भजन, कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. तीनही सत्रात महाआरती करण्यात आली, तर सांजआरती उपमहापौर नीलेश आहेर यांच्या हस्ते करण्यात आली.
महादेव सेवा समितीतर्फे सामुदायिक शिवस्मृती पठण करण्यात आले. मंदिर प्रशासनातर्फे साबुदाणा खिचडीचा प्रसाद वाटप करण्यात आला, तर रात्री महाआरती नंतर महाप्रसाद दुधाचे वाटप करण्यात आले.
यावेळी महादेव सेवा समिती, जय शंकर भजनी मंडळाचे पदाधिकाऱ्यांसह समितीचे अध्यक्ष पंकज मुंदडा, उत्सव प्रमुख प्रवीण बच्छाव, रमेश मंडाळे, राजेश वाजपेयी, कृष्णा पाटील, विवेक वारुळे, खेमचंद तलरेजा, महारु मंडाळे, हेमंत चौधरी, विश्वनाथ लिंगायत, महादेव भक्तांसह शहरातील नागरिक उपस्थित होते.
मालेगाव कॅम्प परिसरात विविध महादेव मंदिरात धार्मिक विधी संपन्न झाले़ तर येथील मोसम नदी घाटावरील पुरातन महादेव मंदिरात पहाटेपासून महाशिवरात्रीनिमित्ताने अभिषेक, आरती व दर्शन घेण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली होती. शहरातील महादेव घाटावरील महादेव मंदिर, संगमेश्वर झांजेश्वर मंदिर, सोयगाव, कॅम्प, कॅम्प रस्ता, रावळगाव नाका परिसरातील विविध शिवमंदिरांमध्ये शिवरात्रीनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

झोडगेतील हेमाडपंती मंदिरात यात्रोत्सव 
झोडगे : माळमाथा परिसरातील ५६ गावांची बाजारपेठ समजल्या जाणाºया झोडगे गावात प्राचिन हेमाडपंती माणकेश्वर महादेवाच्या मंदिरात यात्रोत्सव झाला़ महादेवाच्या दर्शनासाठी आबालवृद्धांनी रांग लावली होती. विशेष म्हणजे महाशिवरात्रीनिमित्त परिसरातील अनेक भाविक भगवान माणकेश्वराच्या दर्शनासाठी येऊन नवस फेडतात. गावातून रथयात्रा काढण्यात आली़ महाशिवरात्रीच्या दुसºया दिवशी कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात येते. विशेष म्हणजे या ठिकाणी नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातून पहिलवान कुस्तीच्या दंगलीसाठी येत असतात. विशेष म्हणजे याठिकाणी दीडशे वर्षांची जुनी परंपरा या मंदिराला आहे. यंदादेखील माणकेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती.

Web Title: The sound of a bomb blast in Shiva temples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.