कर्णकर्कश हॉर्नचा दणदणाट अन‌् सगळ्यांचेच कानावर हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2021 04:25 AM2021-02-18T04:25:36+5:302021-02-18T04:25:36+5:30

---- नाशिक : शहरात अलिकडे हॉर्नचा गोंगाट अधिकच वाढला आहे. कर्णकर्कश तसेच फॅन्सी हॉर्न बसविण्यासह बुलेटसारख्या अन्य स्पोर्टस बाईकच्या ...

The sound of a loud horn and hands on everyone's ears | कर्णकर्कश हॉर्नचा दणदणाट अन‌् सगळ्यांचेच कानावर हात

कर्णकर्कश हॉर्नचा दणदणाट अन‌् सगळ्यांचेच कानावर हात

Next

----

नाशिक : शहरात अलिकडे हॉर्नचा गोंगाट अधिकच वाढला आहे. कर्णकर्कश तसेच फॅन्सी हॉर्न बसविण्यासह बुलेटसारख्या अन्य स्पोर्टस बाईकच्या सायलेंसरमध्येसुध्दा तांत्रिक बदल करून वेगळ्या पध्दतीचा फटाक्यांसारखा आवाज निर्माण करण्याचे वाढलेल्या फॅडमुळे नाशिककरांचे कानठिळ्या बसत आहेत; मात्र हॉर्नच्या नावाखाली सुरू असलेला या दणदणाटाबाबत सगळ्यांनीच कानावर हात ठेवल्याचे दिसून येत आहे.

लॉकडाऊन काळात शून्यावर पाेहोचलेले ध्वनीप्रदूषण लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर अचानकपणे वाढल्याचे दिसून येते. ध्वनीप्रदूषणात सर्वाधिक भर पडत आहे, ती म्हणजे हॉर्नच्या गोंगाटाची. कारण बहुतांश वाहनचालक आपल्या वाहनांना सर्रासपणे वेगवेगळ्या प्रकारचे फॅन्सी हॉर्न बसवत असून, त्याचा त्रास इतरांना सहन करावा लागत आहे. शहरात धावणाऱ्या बुलेट दुचाकींमध्ये बहुतांश दुचाकींची फायरिंग ही कृत्रिम तांत्रिक बदल केल्यामुळे विचित्र प्रकारची आणि कानाला नकोशी होणारी आहे. बहुसंख्य बुलेट दुचाकी तर शहरात केवळ ‘फटाके’ फोडतच धावतात की काय, अशी शंका येते. शहर वाहतूक शाखा तसेच प्रादेशिक परिवहन विभागाने मोटार वाहन कायद्यातील तरतुदीप्रमाणे अशा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

दुचाकी तसेच काही रिक्षांना आणि पीकअप जीपलासुध्दा रुग्णवाहिका, पोलीस सायरनसारखे हॉर्न बसविले जाऊ लागल्याचे निदर्शनास येत आहे.

--इन्फो--

वर्षभरात ५२ लोकांना दंड

गेल्या वर्षभरात शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून म्युझिकल हॉर्न बसविणाऱ्यांपैकी ३१, तर कर्णकर्कश हॉर्न बसविणाऱ्या २१ वाहनचालकांवर शहर वाहतूक शाखेने दंडात्मक कारवाई केली आहे. मोटार वाहन कायद्यातील तरतुदीप्रमाणे अशा वाहनचालकांना ५०० रुपयांचा दंड ठोठावला जातो. दंडात्मक कारवाईनंतरही जर कृतीत बदल झाला नाही, तर संबंधित वाहनचालकाविरुध्द पोलीस ठाण्यात थेट गुन्हाही वाहतूक पोलिसांकडून दाखल केला जाऊ शकतो.

---इन्फो---

हॉर्नच्या गोंगाटाचे कोणालाच काही कसे वाटत नाही

शहरात दिवसेंदिवस दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या भरमसाठ वाढत आहे. त्यातच वेगवेगळ्याप्रकारचे फॅन्सी हॉर्न बसविण्याची वाढलेली क्रेझ यामुळे ध्वनीप्रदूषणाचा उच्चांक वाढत आहे; मात्र ध्वनी प्रदूषणाबाबत राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय कार्यालय शहरात अस्तित्वात आहे; मात्र ध्वनी प्रदूषण मोजण्याची कुठलीही तरतूद नसल्याचे सूत्रांनी सांगितले. केवळ दीपावलीच्या काळात फटाक्यांचा आवाज मोजण्याकरिता यंत्रे संबंधित कार्यालयाकडून बाहेर काढली जातात.

---इन्फो--

घाबरविणाऱ्या हॉर्नमुळे भरतेय धडक

शहरात फॅन्सी हॉर्नसह घाबरविणाऱ्या हॉर्नचीही भर पडू लागल्याने नागरिकांत धडकी भरत आहे. चारचाकींना तर चक्क एखाद्या बाळाला धक्का लागला अन‌् तो भीतीपोटी ओक्साबोक्सी रडतोय, असाही हॉर्न अलिकडे शहरात काही वाहनचालकांनी बसविल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे अशा विचित्र प्रकारच्या हॉर्नवर तत्काळ बंदी घालण्याची मागणी होत आहे.

----

डमी फॉरमेट१७हॉर्न सायलेंन्सर नावाने सेव्ह/ तसेच फोटो- १७हॉर्न/१७हॉर्न१/१७हॉर्न सायलेंसर नावाने आर वर सेव्ह आहे.

===Photopath===

170221\17nsk_5_17022021_13.jpg

===Caption===

हॉर्नचा गोंगाट वाढतोय

Web Title: The sound of a loud horn and hands on everyone's ears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.