‘त्या’ आवाजाने २० किलोमीटर परिसर हादरला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 08:37 PM2020-04-28T20:37:10+5:302020-04-28T23:03:18+5:30

ओझर (सुदर्शन सारडा) : २८ एप्रिल रोजी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास ओझरसह आजूबाजूच्या वीस किमी परिसरात मोठा आवाज झाला होता. आवाजावरून सोशल मीडियात वेगवेगळी कारणे व्हायरल झाली होती. मात्र, हा आवाज ओझर येथे असलेल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीमध्ये सुपरसॉनिक तंत्रज्ञान विमानाच्या चाचणीदरम्यान झाला असल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा या आवाजाचे गूढ उकलले.

 'That' sound shook the 20 km area! | ‘त्या’ आवाजाने २० किलोमीटर परिसर हादरला !

‘त्या’ आवाजाने २० किलोमीटर परिसर हादरला !

Next

ओझर (सुदर्शन सारडा) : २८ एप्रिल रोजी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास ओझरसह आजूबाजूच्या वीस किमी परिसरात मोठा आवाज झाला होता. आवाजावरून सोशल मीडियात वेगवेगळी कारणे व्हायरल झाली होती. मात्र, हा आवाज ओझर येथे असलेल्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीमध्ये सुपरसॉनिक तंत्रज्ञान विमानाच्या चाचणीदरम्यान झाला असल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा या आवाजाचे गूढ उकलले. आजूबाजूच्या नागरिकांना एचएएल व्यवस्थापनामार्फत आवाहन करण्यात आले आहे की, कोणीही घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही.
एचएएल कंपनीमध्ये लढाऊ विमाने तयार केली जातात. त्यामुळे या विमानांची चाचणी परिसरात होत असते. बऱ्याचदा नाशिक
शहराच्या वेशीपर्यंत ही विमाने आकाशात घिरट्या घालताना नजरेस पडतात. मंगळवारी यातील एका सुपरसॉनिक विमानाची चाचणी ओझरमधील एचएएलच्या परिसरात पार पडली. यावेळी कानठळ्या बसवणारा आवाज ओझरच्या पंचक्रोशीत ऐकू आला. शहरातही काही भागात हा आवाज ऐकू आला.
सध्या संचारबंदी सुरू असल्यामुळे केवळ अत्यावश्यक सेवा सुरू आहे. अनेकांची कामे घरून सुरू आहेत. यामध्ये संपर्काचे माध्यम केवळ सोशल मीडियात आणि फोन एवढेच उरले आहे. यादरम्यान, नाशिककरांना एकमेकांना संदेश, फोन स्वरूपात संपर्क करून
अचानक झालेल्या आवाजाबाबत विचारपूस केली. यावेळी फक्त आवाज ऐकू आला, कसला आला, कुठून आला कुणालाही माहिती नव्हते. दरम्यान याबाबत माहिती घेतली असता सुपरसॉनिक विमानांची चाचणी केल्यामुळे हा आवाज झाल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
------
कसा होतो आवाज?
एका आवाजाच्या वेगाला एक मॅक असे म्हटले जाते. एका मॅकच्या पुढे आवाजाचा वेग जातो तेव्हा वातावरणाला भेदत असताना त्याचा मोठा आवाज होतो. त्याला सुपरसोनिक बूम असे म्हणतात. माहितीगारांच्या म्हणण्यानुसार, हा आवाज ध्वनीच्या गतीपेक्षा पाचपटहून अधिक असतो. या आवाजाला बºयाचदा हायपरसॉनिक म्हणूनदेखील ओळखले जाते. विमानातून चाचणीदरम्यानचा ध्वनी लवचिक माध्यमात प्रेशरवेव्हच्या रूपात प्रवास करीत असतो. हवेत ध्वनी वेगवेगळ्या वेगाने रेखांशाचा प्रवास करते. ४ पाण्याच्या तपमानावर सुपरसोनिक वेग १,४४० मीटर म्हणजेच ४,७२४ फूट / से.पेक्षा जास्त वेग मानला जाऊ शकतो. घनरूपांमध्ये, ध्वनी लाटा रेखांशाच्या किंवा ट्रान्सव्हर्सली ध्रुवीकरण केल्या जातात. यापेक्षाही अधिक हा आवाजाचा वेग असतो. त्यामुळे साहजिकच कानठळ्या बसवणारा आवाज होतो.

Web Title:  'That' sound shook the 20 km area!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक