ध्वनिक्षेपकास आठ दिवस मुभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 12:44 AM2017-08-30T00:44:30+5:302017-08-30T00:44:35+5:30
आॅगस्ट ते डिसेंबर या चार महिन्यांच्या काळातील दहा दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक, वाद्य वाजविण्यास अनुमती देण्यासाठी दिवस निश्चित करणारे अहवाल पोलीस खात्याकडून उशिरा आल्याने या दहा दिवसांतील दोन दिवस वाया गेले असून, उर्वरित आठ दिवस निश्चित करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी घेणार आहेत.
नाशिक : आॅगस्ट ते डिसेंबर या चार महिन्यांच्या काळातील दहा दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक, वाद्य वाजविण्यास अनुमती देण्यासाठी दिवस निश्चित करणारे अहवाल पोलीस खात्याकडून उशिरा आल्याने या दहा दिवसांतील दोन दिवस वाया गेले असून, उर्वरित आठ दिवस निश्चित करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी घेणार आहेत. गेल्या आठवड्यात राज्य सरकारने यासंदर्भातील आदेश काढून जिल्हाधिकाºयांनी पोलिसांच्या शिफारशी स्वीकारून दहा दिवस निश्चित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवून सण, उत्सवाचे दहा दिवस निश्चित करण्याबाबत अहवाल मागविला होता. त्यानुसार मंगळवारी पोलिसांचे अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यात पोलीस आयुक्तांनी गणेशोत्सवासाठी चार दिवस, नवरात्रोत्सवात तीन दिवस, दिवाळी, ख्रिसमस, ३१ डिसेंबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत वाद्य वाजविण्यास अनुमती देण्यास हरकत नसल्याचे म्हटले तर, पोलीस अधीक्षकांनी नवरात्रोत्सवातील एक दिवस कमी करून कोजागरी पौर्णिमेलाही मुभा द्यावी, अशी शिफारस केली आहे. पोलिसांच्या अहवालावर जिल्हाधिकारी अंतिम निर्णय घेणार असले तरी, गणेशोत्सवातील चार दिवसांपैकी दोन दिवसांची मुदत संपुष्टात आली आहे.
रात्री बारावाजेपर्यंत दणदणाट
पोलिसांनी गणेशोत्सवाच्या दुसºया दिवशी व गौरीच्या आगमनाला म्हणजेच मंगळवारी रात्री बारापर्यंत मुभा देण्याची शिफारस केली होती, परंतु पोलिसांचा अहवालच मंगळवारी प्राप्त झाल्याने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाच्या या निर्णयाची माहिती होणे शक्यच नाही, शिवाय जिल्हाधिकाºयांनी अद्याप त्यावर शिक्कामोर्तबही केलेले नाही. आता गौरी विसर्जन व अनंत चतुर्दशी या दोन दिवसात रात्री बारापर्यंत वाद्य व ध्वनिक्षेपकाचा दणदणाट करता येणे शक्य आहे.