मालेगाव तालुक्यात ८०.५१ टक्के खरीप पिकांची पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:11 AM2021-07-21T04:11:36+5:302021-07-21T04:11:36+5:30
जुलै महिना उलटत आला आहे. मात्र, तरीदेखील दमदार पाऊस झाला नसल्याने तालुक्यातील नदी- नाले पाण्याने खळखळून वाहिले नाहीत, तर ...
जुलै महिना उलटत आला आहे. मात्र, तरीदेखील दमदार पाऊस झाला नसल्याने तालुक्यातील नदी- नाले पाण्याने खळखळून वाहिले नाहीत, तर विहिरींची पाणी पातळी वाढली नाही. तालुक्यात कृषी विभागाने यंदा ९२ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. तालुक्यात गेल्या २९ मेपासून पावसाला सुरुवात झाली. मात्र, आतापर्यंत दमदार पाऊस झाला नाही. केवळ ४५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील काही गावांमध्ये पावसाअभावी पेरण्या रखडल्या आहेत. माळमाथा व काटवन भागात पेरण्या सुरू आहेत. पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त बनले आहेत. अल्पशा पावसावर शेतकऱ्यांनी खरीप पिकांची लागवड केली आहे. तालुक्यात नगदी पीक समजल्या जाणाऱ्या मका पिकाची सर्वाधिक २६ हजार ८०५ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. त्या खालोखाल पांढरे सोने समजल्या जाणाऱ्या कापसाची २० हजार ९६९ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. बाजरीची १५ हजार ३१५ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना मान्यता प्राप्त कृषी सेवा केंद्रांमध्ये नामांकित कंपनींचे बियाणे व खते उपलब्ध करून देण्यात आले आहे. खरीप हंगामासाठी लागणाऱ्या खतांची २५ हजार ८३ मेट्रिक टन नियतन नोंदविण्यात आले आहे. गेल्या जून महिन्यात तालुक्यातील १३८ कृषी सेवा केंद्रांकडे ११ हजार ५२४ मेट्रिक टन खते उपलब्ध झाले आहेत. उर्वरित खते येत्या सप्टेंबर महिन्यात उपलब्ध होणार आहेत. तालुक्याची पर्जन्य मानाची सरासरी ४५७.६१ मि.मी. आहे. गेल्या वर्षी ३५४.० मि. मी. पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. यंदाही दमदार पावसाची प्रतीक्षा शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
---------------------------
पिकांचे नाव - सर्वसाधारण क्षेत्र (हेक्टरमध्ये) - प्रत्यक्ष पेरणी - टक्केवारी
ज्वारी - २२० - २६६ - १२०.९१
बाजरी - २३९११ - १५३१५ - ६४.५
मका - ३३५४९ - २६८०५ - ७९.०
इतर तृणधान्य / चारा पिके - ८२४ - ० - ०
एकूण तृणधान्य - ५८५०४ - ४२३८६ - ७२.४५
तूर - ७८९ - ४१२ - ५२.२२
मूग - २१८८ - १४४० - ४२.५०
उडीद - २५६ - २०५ - ८०.८
भुईमूग - ११५४ - ६८० - ५८.९३
सोयाबीन - ५२ - ७८ - १५०.०
कापूस - १७७५१ - २०९६९ - ११८.१३
200721\20nsk_2_20072021_13.jpg
मालेगाव तालुक्यातील उंबरदे शिवारात खरीप पिकांची पेरणी करताना शेतकरी.