बागलाणमध्ये पेरण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2019 10:45 PM2019-07-10T22:45:34+5:302019-07-10T22:45:57+5:30

खमताणे : बागलाण तालुक्यात रोहिणी, मृग व आर्द्रा तिन्ही नक्षत्रात मोठा पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी धूळवाफेवर बाजरी, भुईमगाची पेरणी केली असली तरी, उगवण क्षमतेवर प्रश्नचिन्ह आहे. बागलाण तालुक्यात केवळ ५० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

Sowing is done in Baglan | बागलाणमध्ये पेरण्या खोळंबल्या

बागलाणमध्ये पेरण्या खोळंबल्या

Next
ठळक मुद्देबळीराजा चिंतित : पावसाची वक्रदृष्टी

खमताणे : बागलाण तालुक्यात रोहिणी, मृग व आर्द्रा तिन्ही नक्षत्रात मोठा पाऊस न झाल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी धूळवाफेवर बाजरी, भुईमगाची पेरणी केली असली तरी, उगवण क्षमतेवर प्रश्नचिन्ह आहे. बागलाण तालुक्यात केवळ ५० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
जुलै महिना सुरू होऊन आठवडा झाला तरी पाऊस नसल्याने पेरण्या लांबल्याने शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे. जमिनीची नांगरणी, वखरणी करून शेतकरी पेरणीसाठी सज्ज असला तरी, पाऊस रोजच हुलकावणी देत आहे. गेल्या वर्षी मक्याला चांगला भाव मिळाल्याने यावर्षी बहुतांश शेतकरी मका पेरणी करण्यास उत्सुक आहे; मात्र त्यासाठी जमिनीची ओल अधिक असावी लागते; परंतु तसा मोठा पाऊस झाला नसल्याने पेरण्या करण्याच्या मर्यादा पडत आहेत. गेल्या वर्षी पावसाने व शेतमालाच्या अल्प भावाने दगा दिल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे; परंतु कर्ज
काढून, उसनवार घेत शेतकरी पेरणीसाठी बियाणे, खते खरेदी करीत
आहे; मात्र पाऊसच नसल्याने पेरण्या खोळंबल्या असल्याने शेतकºयांचा धीर सुटू लागला आहे. ज्यांच्याकडे बैलजोडी आहे, ते स्वत: शेतीची मशागत व पेरणी करण्यास प्राधान्य देत असल्याने भाडेतत्त्वावर औत मिळणेही महागडी बाब ठरत आहे. बैलजोडीसह औत याचे दिवसाला हजार रु पये मजुरी झाली असल्याने बैलजोडी नसणाºयाला शेती करणे खर्चीक होणार आहे.

Web Title: Sowing is done in Baglan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी