जिल्ह्यात महिनाभरात अवघी ९७ हजार हेक्टरवर पेरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:10 AM2021-07-03T04:10:49+5:302021-07-03T04:10:49+5:30
खरिपाची पेरणी करताना शेतकऱ्यांनी भात, ज्वारी, बाजरी, मका, कापूस, सायाबीन, भुईमूग, आदी पिकांची थोड्याफार प्रमाणात पेरणी केली आहे. ...
खरिपाची पेरणी करताना शेतकऱ्यांनी भात, ज्वारी, बाजरी, मका, कापूस, सायाबीन, भुईमूग, आदी पिकांची थोड्याफार प्रमाणात पेरणी केली आहे. पेरणी झालेल्या एकूण क्षेत्रापैकी २०३१२.२० हेक्टरवर कापूस, १०७९३.६१ हेक्टरवर तेलबिया, ७८५६ हेक्टरवर डाळवर्गीय, तर ५८०७५ हेक्टरवर तृणधान्य, तर ६५९३१ हेक्टरवर अन्नधान्य पिकांची लागवड करण्यात आली आहे. मका, सोयाबीन, भुईमूग, मूग या पिकांना प्राधान्य देण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांना पोळ कांदे करायचे आहेत त्यांनी सध्या मुगाची पेरणी केली असून, मूग निघाल्यानंतर त्वरित कांद्यासाठी रान मोकळे होत असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे.
चौकट-
सूर्यफुलाकडे शेतकऱ्यांची पाठ
जिल्ह्यात काही भागात सूर्यफुलाची लागवड होत होती; मात्र गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांनी या पिकाकडे पाठ फिरविली आहे. सूर्यफुलासाठी ३६ हेक्टर इतके क्षेत्र गृहीत धरलेले असले तरी अद्याप एकाही ठिकाणी सूर्यफुलाची लागवड करण्यात आलेली नाही. तर तिळाची अवघी ०.११ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. कांदा दराकडे लक्ष ठेवून अनेक शेतकऱ्यांनी कांद्यासाठी काही क्षेत्र राखीव ठेवले आहे.
चौकट -
जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पेरणीची टक्केवारी
एकूण तृणधान्य - १३.०३
डाळी -९.२८
एकूण अन्नधान्य - १२.४३
एकूण तेलबिया - ११.३९
कापूस - ५०.३७
एकूण खरीप पेरणी - १४.५८