गतवर्षाच्या तुलनेत पेरण्या अवघ्या तीन टक्केच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:11 AM2021-06-22T04:11:05+5:302021-06-22T04:11:05+5:30
नाशिक जिल्ह्यात खरिपात प्रामुख्याने भात, बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन, तृणधान्य व काही भागात कापसाचे उत्पन्न घेतले जाते. साधारणत: सर्वात ...
नाशिक जिल्ह्यात खरिपात प्रामुख्याने भात, बाजरी, ज्वारी, मका, सोयाबीन, तृणधान्य व काही भागात कापसाचे उत्पन्न घेतले जाते. साधारणत: सर्वात अगोदर बाजरी, सोयाबीन या पिकांना प्राधान्य देण्यात आल्यानंतर पाण्याचा अंदाज घेऊन मका पेरला जातो. त्यामुळे गेल्या वर्षी जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत एकूण सरासरीच्या २२.३३ टक्के इतका पाऊस नोंदविला गेला होता. परिणामी भाताची जवळपास ९६ टक्के क्षेत्रावर तर बाजरी ७१ टक्के क्षेत्रातवर पेरणीपूर्ण झाली होती. गेल्या वर्षी अन्य पिकांचे क्षेत्र कमी झाल्याने ज्वारीचीदेखील मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली होती. एकूण खरिपाच्या लागवडीच्या क्षेत्राच्या तुलनेत सुमारे ५० टक्के पेरण्यांचे काम जून महिन्यातच आटोपूनच शेतकरी निर्धास्त झाले होते. यंदा मात्र शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
चौकट===
ताैक्ते वादळाचा पाऊस मान्सूनपूर्व पावसाच्या वेळेत आल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला; परंतु तसाच पाऊस जूनच्या पहिल्या वा दुसऱ्या आठवड्यात अपेक्षित होता. मात्र तसे झाले नाही. अजूनही वेळ गेली नसली तरी, पावसाचे जास्त लांबणे चिंता वाढविणारे आहे. शेतकरी पेरणीसाठी सज्ज असल्याने फारसा परिणाम तूर्त दिसत नाही.
= संजय पाटील, कृषी सहायक