मानोरी परिसरात पेरण्यांचा खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:18 AM2021-07-07T04:18:04+5:302021-07-07T04:18:04+5:30
जून महिन्याच्या सुरुवातीला मृग नक्षत्राच्या पहिल्या पावसाने मानोरी परिसरात दमदार हजेरी लावली होती. या पावसाच्या भरवशावर अनेक शेतकऱ्यांनी शेती ...
जून महिन्याच्या सुरुवातीला मृग नक्षत्राच्या पहिल्या पावसाने मानोरी परिसरात दमदार हजेरी लावली होती. या पावसाच्या भरवशावर अनेक शेतकऱ्यांनी शेती मशागतींची कामे पूर्ण केली होती. मशागतीची कामे पूर्ण होऊन सुमारे महिना उलटला असून, मानोरी परिसरात पावसाने उघडीप दिली आहे.
--------------------------
बियाण्यांची खरेदी
शेती मशागतीची कामे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील खते, बियाण्यांची खरेदी करून ठेवली आहे. आज येईल, उद्या येईल, दोन दिवसांनी नक्की येईल, या आशेवर पूर्ण जून महिना सरला असून, अद्यापही मुसळधार पाऊस होत नसल्याने, पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या असल्याचे दिसून आले आहे. उत्तर पूर्व भागातील बहुतांश भागात खरीप हंगामातील पिकांची पेरणी पूर्णत्वास गेली असल्याचे दिसून येत आहे. बहुतांश भागात खरीप हंगामातील पेरण्या झालेल्या भागात पिके जमिनीतून डोकावले असून, परिसर हिरवीगार झाला असल्याचे सुखद दृश्य बघायला मिळत आहे.