एकलहऱ्यात बहरले सोयाबीनचे पीक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 12:52 AM2018-08-29T00:52:51+5:302018-08-29T00:53:30+5:30
नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात रिमझिम पावसाच्या संततधारेमुळे शेतातील पिके जोमाने बहरू लागली आहेत.
एकलहरे : नाशिक तालुक्याच्या पूर्व भागात रिमझिम पावसाच्या संततधारेमुळे शेतातील पिके जोमाने बहरू लागली आहेत. एकलहरे, सामनगाव, कोटमगाव, हिंगणवेढे, जाखोरी, कालवी, पाडळी, लाखलगाव, ओढा, शिलापूर व आजूबाजूच्या पंचक्रोशीमध्ये श्रावण सरींची रिमझिम एकसारखी सुरू आहे. त्यामुळे सोयाबीन, भुईमूग, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर आदी पिके जोमाने बहरू लागली आहेत. तसेच दीड-दोन महिन्यांपूर्वी लागवड केलेले सोयाबीन, टोमॅटोची पिके बहरू लागली आहेत. टोमॅटोला बहर आला असून, हिरवेगार टोमॅटो लगडले आहेत. अनेक ठिकाणी कोबी व फ्लॉवरचे गड्डे आकार घेऊ लागले आहेत. तर काही ठिकाणी शेंगांची लागवड सुरू झाली आहे. सतत पडणाºया श्रावण सरींमुळे सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले असून, शेतात जाणाºया कच्च्या रस्त्यांवरून येणे-जाणे अवघड झाले आहे. तरीदेखील शेतकरी भाजीपाला, जनावरांसाठी लागणारी वैरण ट्रॅक्टरमध्ये भरून मार्केटला नेताना दिसत आहे.