येवला तालुक्यात सोयाबीन, मका पिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2019 02:33 PM2019-11-07T14:33:10+5:302019-11-07T14:33:20+5:30
देशमाने : येवला तालुक्यातील गत वर्षाचा दुष्काळ, अन चालू वर्षाचा ओला दुष्काळ यामुळे शेतकरी अधिकच आर्थिक संकटात सापडला आहे. चालू खरीप हंगाम तर शेतकरी वर्गाचा पूर्ण कसोटी घेणारा ठरला आहे. या हंगामात एकापाठोपाठ समस्या शेतकर्यांची पाठ सोडायला तयार नाही.अनेक संकटाचा सामना करत शेतकरी मेटाकुटीस आला आहे. तरु ण शेतकरी वर्ग तर आता शेतीच कसायला नको म्हणतो आहे.
देशमाने : येवला तालुक्यातील गत वर्षाचा दुष्काळ, अन चालू वर्षाचा ओला दुष्काळ यामुळे शेतकरी अधिकच आर्थिक संकटात सापडला आहे. चालू खरीप हंगाम तर शेतकरी वर्गाचा पूर्ण कसोटी घेणारा ठरला आहे. या हंगामात एकापाठोपाठ समस्या शेतकर्यांची पाठ सोडायला तयार नाही.अनेक संकटाचा सामना करत शेतकरी मेटाकुटीस आला आहे. तरु ण शेतकरी वर्ग तर आता शेतीच कसायला नको म्हणतो आहे. दिवस-रात्र शेतात कष्ट करून ही कधी सुलतानी तर कधी अस्मानी संकटाने शेती व्यवसाय शेकऱ्यांसाठी आता जीवघेणा ठरत आहे. परिसरात अल्पपावसाच्या ओलीवर खरिपाच्या पेरण्या झाल्या. त्यानंतर सुमारे एक महिना पावसाने ओढ दिली. ऐन बहरात असताना सोयाबीन, बाजरी व मका ही पिके सुकून उत्पादन घटले. शेतकऱ्यांना खरिपात फायदेशीर असलेल्या मका पिकावर यावेळी लष्करी अळीचे संकट ओढवले. पीक वाचिवण्यासाठी औषध फवारणीचा शेतकर्यास प्रति एकर दहा हजार रूपये अतिरिक्त खर्च करावा लागला. सोयाबीन व बाजरी पिकांचे देखील उत्पादन घटले. कांदा पीक तर वारंवार रोपे बदलत्या हवामानामुळे कुजल्याने अनेक शेतकºयांना अद्याप कांदा लागवड करता आली नाही. मोचक्याच शेतकर्यांकडे ती देखील अल्पप्रमानात कांदा लागवड झाली. द्राक्ष उत्पादक शेतकरी तर संपूर्ण पिकच गेल्याने पूर्णत: उध्वस्त झाला आहे. एकूणच परतीच्या पावसाने मोठ्या कष्टाने उभा केलेला खरीप हंगाम शेतकर्यांच्या हातातून हिसकवला असून शेती अन शेतकºयांचे दिवाळे काढले आहे. मुख्य पीक असलेल्या कांदा पिकाचे रोप चौथ्यांदा टाकण्याची वेळ आली आहे. पण आता स्वत:जवळील बियाणे देखील संपल्याने अन सिड्स बियाणे विकत घेण्यासाठी पैसाही नाही, अशा विचित्र विवंचनेत शेतकरी सापडला आहे.