सोयाबिन तेल १५५ रुपये लिटर ; मेथीची जुडी ३८ रुपयांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:13 AM2021-04-26T04:13:15+5:302021-04-26T04:13:15+5:30
सफरचंद, संत्रा, डाळींब आणि इतर फळांची आवक स्थिर आहे. फळांना सध्या चांगली मागणी असल्याने भाव वाढलेले आहेत. घाऊक बाजारात ...
सफरचंद, संत्रा, डाळींब आणि इतर फळांची आवक स्थिर आहे. फळांना सध्या चांगली मागणी असल्याने भाव वाढलेले आहेत. घाऊक बाजारात आरक्ता डाळींब ८० रुपये किलोने विकले जात आहे. किरकोळ बाजारात यापेक्षा अधिक दर आकारला जातो. किराणा बाजारात सर्व डाळींचे भाव वाढलेले आहेत. सर्वच बाजाराला लॉकडाऊनचा फटका बसला असून ग्राहकी कमी झाली आहे. काही शहरांमध्ये किरकोळ विक्रेत्यांना रस्त्यावर भाजीपाला विक्रीसाठी बसू दिले जात नसल्याचा फटका काहीअंशी भाजीपाल्याला सहन करावा लागतो.
चौकट -
कांदापात ४० रुपये जुडी
कांदा दरात सातत्याने घसरण होत असताना कांदापातीला मात्र सध्या चांगला दर मिळत असून घाऊक बाजारात ४० रुपये जुडी विकली जात आहे. तर मेथी ३८ रुपये जुडी आहे.
चौकट-
संत्री ७० रुपये किलो
घाऊक बाजारात संत्री ४० पासून ७० रुपयांपर्यत तर सफरचंद १०० पासून १२० रुपये किलो या दराने विकली जात आहे. सध्या डाळींबाची ४०० ते ५०० क्विंटलपर्यंत आवक होत असून ८० ते ९० रुपये किलो विकले जात आहे.
चौकट-
तांदुळ महागला
मसुरी व्यतिरिक्त लष्करी, कमोद आदी प्रकारच्या तांदळाच्या दरात तीन ते चार रुपयांनी वाढ झाली आहे. स्थिर झालेले खाद्यतेलाचे भा पुन्हा तेजीकाडे झुकले आहेत. सर्वच खाद्य तेलांच्या किमती वाढल्या आहेत.
कोट-
शासनाने लॉकडाऊनमध्ये किराणा मालाच्या दुकानाची वेळ सकाळी ९ ते दुपारी २ अशी करायला हवी. सकाळी ७ ते ११ ची वेळ चुकीची असून त्याचा ग्राहकीवर मोठा परिणाम झाला आहे. - अनिल बुब, किराणा व्यापारी
कोट-
ऊन्हामुळे विहिरींचे पाणी कमी झाले आहे. भाजीपाला पिकांना पाणी देणे अवघड झाले आहे. त्याचा उत्पादनावर नरिणाम झाला आहे. लॉकडाऊनमळे भाजीपाल्याला उन्हाळ्यात मिळणाऱ्या भावापेक्षा सध्याचे दर कमी आहेत. - अविनाश रौंदळ, शेतकरी
कोट-
कोरोनामुळे रोजगार बंद पडला आहे. आहे त्या बचतीवर घर चालवावे लागत असताना विविध वस्तूंची सातत्याने दरवाढ होत आहे. यामुळे पैसा पुरत नाही. शासनाने दरवाढ कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. - रजनी जाधव, गृहिणी