सोयाबीनला हमीपेक्षा कमी भाव; शेतकºयांची दिवाळी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 11:59 PM2017-10-05T23:59:15+5:302017-10-06T00:09:59+5:30
सोयाबीनचे भाव कोसळल्याने शेतकरीवर्गात नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून अडचणीत सापडलेल्या बळीराजाची दिवाळीही आर्थिक अडचणीत जाण्याचे चित्र सध्या दिसत आहे.
नायगाव : सोयाबीनचे भाव कोसळल्याने शेतकरीवर्गात नाराजी व्यक्त होत आहे. गेल्या काही दिवसांपासून अडचणीत सापडलेल्या बळीराजाची दिवाळीही आर्थिक अडचणीत जाण्याचे चित्र सध्या दिसत आहे.
यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकरीवर्ग आनंदी होता. परिणामी कांद्याचे पीक घेतल्याने उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने बाजारभाव कोसळले. त्यामुळे उत्पादन खर्चही न फिटल्याने बळीराजा अडचणी सापडला. दरम्यान, बाहेरील राज्यातील कांदा सडल्याने महाराष्ट्रातील कांद्याला चांगले दिवस येत असताना केंद्र शासनाने व्यापारीवर्गावर छापे मारल्याने भाव पुन्हा कोसळले. कांद्याच्या वांद्यानी शेतकरी वर्ग बेजार झाले असतांना बळीराजा आर्थिक अडचणीत सापडला. कांद्या पाठोपाठ टमाटे व सोयाबिन पिकांची विक्र ी माती मोल भावात होत असल्याने शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. सध्या बाजारात सोयाबीन दोन हजार सातशे रु पये क्विंटल दर मिळत आहे. सोयाबीनचे पिक प्रतिकुल परिस्थतीत सांभाळून, सोयाबीन बाजारात येई पर्यत सुमारे पंधराशे ते सतराशे रु पये खर्च येत असल्याने सध्याचा बाजारभाव परवडत नसल्याने शेतकरी वर्गात नाराजी व्यक्त होत आहे.