चांदगिरी भागात सोयाबीन बहरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 09:52 PM2020-07-27T21:52:37+5:302020-07-27T23:22:44+5:30
एकलहरे : सोयाबीन हे महत्त्वाचे तेलबिया पीक म्हणून सर्वपरिचित आहे. तालुक्याच्या पूर्व भागात सोयाबीन लागवड मोठ्या प्रमाणात केलेली दिसते. कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ झालेली दिसते. तालुक्याच्या पूर्व भागात दि. १५ जून ते दि. १५ जुलै दरम्यान सोयाबीनची पेरणी केली असल्याने तण खुरपणीत शेतकरी व्यस्त आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क

विशेषत: जाखोरी, चांदगिरी परिसरात खरीप हंगामाच्या सुरु वातीलाच पेरणी झाली असल्याने व बऱ्यापैकी पावसाने हजेरी लावल्याने महिनाभराचे वाढलेले सोयाबीनचे पीक डौलाने बहरलेले दिसते. या सोयाबीन पिकातील तणाची खुरपणी करण्याचे काम सद्या शेतकरी करताना दिसतात.
पेरणीनंतर सुरु वातीचे ६ ते ७ आठवडे हे तणवाढीच्या दृष्टीने संवेदनक्षम असल्याने सुरु वातीला पीक तणविरहित ठेवणे अधिक उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. त्यासाठी २० ते ३० दिवसांनी एक कोळपणी व ४५ दिवसांनी दुसरी कोळपणी केली जाते. गरजेनुसार एक दोन खुरपण्या देऊन पीक तणविरहित ठेवावे लागते. तण नियंत्रणाच्या दृष्टीने रासायनिक तणनाशकांमुळेही चांगल्याप्रकारे सोयाबीनमधील तणाचा बंदोबस्त करता येतो, त्यामुळे पीक जोमदार येते असे शेतकऱ्यांनी सांगितले.वेळोवेळी कोळपणी करण्याची गरजकोरडवाहू शेती पद्धतीत सोयाबीन पुष्कळदा सलग पीक म्हणून घेतले जाते. काही ठिकाणी आंतरपीक पद्धतीचा अवलंब केला जातो. तूर, कपाशी, भुईमूग, ज्वारी, बाजरी या पिकांमध्ये सोयाबीनचे आंतरपीक घेता येते. पेरणीनंतर सुरु वातीला पिकाच्या वाढीसाठी तणविरहित ठेवणे महत्त्वाचे असते. त्यासाठी वेळोवेळी कोळपणी करण्याची गरज असते.आंतरपिकातील सोयाबीनसारखे नगदी पीक शेतकºयांच्या आर्थिक अडचणी दूर करू शकते. जनावरांसाठी व कुक्कुट पालनासाठी सोयाबीन पेंडीचा पौष्टिक आहार म्हणून उपयोग केला जातो.
- रणजित आंधळे,
सहायक कृषी अधिकारी, जाखोरी.