सोयगाव-डीके स्टॉप रस्ता बनला चिखलाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:15 AM2021-09-11T04:15:37+5:302021-09-11T04:15:37+5:30
पंधरा फूट खोल खोदलेल्या नालीत पाइप टाकल्यावर त्यावर नुसती माती लोटण्यात आली असल्याने पावसामुळे रस्ता चिखलमय झाला आहे. त्यात ...
पंधरा फूट खोल खोदलेल्या नालीत पाइप टाकल्यावर त्यावर नुसती माती लोटण्यात आली असल्याने पावसामुळे रस्ता चिखलमय झाला आहे. त्यात वाहन फसण्याचे प्रमाण वाढले आहे. ट्रक, छोटी मालवाहू रिक्षा, कार, फसणे रोज नित्याचेच झाले आहे. वाहतूकही वाढली आहे. पायी चालणे अवघड झाले आहे. सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले असून, रस्त्यातील खड्डे फार मोठे व खोल झाले आहेत. दररोज दुचाकीस्वार घसरून पडत असल्याने आतापर्यंत अनेकांवर दवाखान्यात जाण्याची वेळ आली आहे. नागरिक अतिशय त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे उपमहापौराचा प्रभाग आहे. काही ठिकाणी चेंबरला तर झाकणच नाहीत. भूमिगत गटाराचे काम ऐन पावसाळ्यातच का चालू करण्यात आले, हा संशोधनाचा विषय आहे. लवकर काम करून नागरिकांना रस्ता मोकळा करण्यात यावा, अशी मागणी होत आहे.