एरंडगाव येथे ‘सभापती आपल्या दारी’ उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2020 04:24 AM2020-12-03T04:24:57+5:302020-12-03T04:24:57+5:30
शेतकरी बांधवांनी शेतीला जोडधंदा म्हणून पशुसंवर्धनाकडे विशेष लक्ष द्यावे. शासनाच्या नावीन्यपूर्ण योजनेतून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या वर्गांना ...
शेतकरी बांधवांनी शेतीला जोडधंदा म्हणून पशुसंवर्धनाकडे विशेष लक्ष द्यावे. शासनाच्या नावीन्यपूर्ण योजनेतून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या वर्गांना ७५ टक्के सवलत असणार्या शेळी गट, पोल्ट्री फॉर्म, गायी गट योजना आहेत, तर खुल्या आणि ओबीसी बांधवांसाठीही ५० टक्के सवलत असणार्या योजना आहेत. शासकीय योजनांचा लाभ घेऊन शेतकरी बांधवांनी आर्थिक उन्नती करावी, असे आवाहन यावेळी सभापती प्रवीण गायकवाड यांनी केले.
पशुसंवर्धन विभागामार्फत तालुक्यातील ९३ हजार ५४५ जनावरांपैकी ६४ हजार ४३३ जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तालुक्यात १७ दवाखान्यांच्या माध्यमातून लसीकरणाचे काम पूर्ण करण्यात येत असल्याची माहिती तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय नाशिककर यांनी प्रास्ताविकात दिली. सूत्रसंचालन डॉ. प्रताप अनर्थे यांनी केले. आभार प्रदर्शन दिनेश जगताप यांनी केले.
कार्यक्रमास योगेश उराडे, छबूराव पडवळ, बाळू गुंजाळ, रावसाहेब शिंदे, रतन गायकवाड, लक्ष्मण पवार, बाबूराव ठोंबरे, बाळू तळेकर, मारुती साप्ते, योगेश उशीर, साहेबराव शिंदे, सुभाष तळेकर, पप्पू शिंदे, अंबादास घोरपडे, गोकुळ शिंदे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
------------------