‘ग्रीन फिल्ड’ संदर्भात शेतकऱ्यांची तातडीने बोलविली बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 01:08 AM2019-05-26T01:08:48+5:302019-05-26T01:09:14+5:30

स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलबाद शिवारात ग्रीन फिल्ड प्रकल्प राबविण्यास शेतकऱ्यांना सादरीकरण न करताच महासभेत प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहे.

 Speaking urgently, farmers called 'Green Field' | ‘ग्रीन फिल्ड’ संदर्भात शेतकऱ्यांची तातडीने बोलविली बैठक

‘ग्रीन फिल्ड’ संदर्भात शेतकऱ्यांची तातडीने बोलविली बैठक

googlenewsNext

नाशिक : स्मार्ट सिटी अंतर्गत मखमलबाद शिवारात ग्रीन फिल्ड प्रकल्प राबविण्यास शेतकऱ्यांना सादरीकरण न करताच महासभेत प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटू लागली आहे. येत्या दि. २९ तारखेस होणाºया महासभेत हा प्रस्ताव असल्याने आता घाईघाईने या प्रकल्पातील प्रस्तावित शेतकºयांची तातडीची बैठक स्मार्ट सिटी कंपनीने येत्या दि. २८ तारखेस बोलाविली आहे.
महापालिकेच्या वतीने हा प्रकल्प स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत राबविण्यात येणार आहे. सदरच्या प्रकल्पास शेतकºयांनी सुरुवातीला विरोध केल्यानंतर त्यांना अहमदाबाद येथील प्रकल्प पाहण्यासाठी नेण्यात आले होते. तेथून परतल्यानंतर नाशिकमधील प्रकल्पाचे सादरीकरण कालिदास कलामंदिरात करण्यात आले. त्यावेळी शेतकºयांनी या प्रकल्पात सहभागी शेतकºयांना नक्की काय लाभ मिळणार, असा प्रश्न केला होता. मात्र आधी सर्वेक्षण करू द्या, मगच लाभाचे गणित मांडता येईल असे शेतकºयांनी स्पष्ट केले होते. शेतकºयांनी सर्वेक्षणास परवानगी दिल्यानंतर प्रकल्पास तयार असल्याने इरादा असल्याचा प्रस्ताव मंजूर करून शासन दरबारी पाठविण्यासाठी महासभेवर प्रस्ताव मांडण्यात आला. त्यामुळे शेतकºयांनी संताप व्यक्त करून सर्वेक्षण बंद पाडले. हा विषय तहकूब करून स्वतंत्र महासभेत त्यावर चर्चा केली जाईल, असे आश्वासन मिळाल्यानंतर सर्वेक्षण पुन्हा करू देण्यात आले.
लोकसभा निवडणुकीमुळे हा विषय काहीसा थंड होता. दरम्यान, स्मार्ट सिटी कंपनीने सर्वेक्षण पूर्ण केले तर आयुक्तांनीदेखील शेतकºयांना जमिनीच्या सहभागाच्या निकषावर तीन मॉडेल मांडले होते. परंतु ते अधिकृतरीत्या शेतकºयांपर्यंत अद्याप पाठविण्यात आलेले नाही तोच येत्या बुधवारी (दि. २९) होणाºया महासभेत ते मांडण्यात आल्याने शेतकºयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटी कंपनीने तातडीने शेतकºयांची बैठक कालिदास कलामंदिरात बोलावली आहे.
तीन प्रकारचे फॉर्म्युले
शेतकºयांनी ग्रीन फिल्ड क्षेत्रासाठी जागा द्यावी यासाठी तीन प्रकारचे लाभाचे फॉर्म्युले आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी मांडले आहेत. त्यानुसार ५० टक्के जागा कंपनीला व ५० टक्केजागा शेतकºयांच्या मालकीची असेल तर काय लाभ मिळू शकतील, त्याच धर्तीवर शेतकºयांनी ५५ टक्के आणि तिसºया फॉर्म्युल्यानुसार ६० टक्के जागा स्वत:कडे ठेवल्यास काय परिणाम होऊ शकतात याबाबत लाभांचे गणित मांडले आहे.

Web Title:  Speaking urgently, farmers called 'Green Field'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.