एड्स जनजागृतीसाठी भिंती केल्या बोलक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 10:45 PM2020-02-08T22:45:32+5:302020-02-09T00:28:32+5:30
एचआयव्ही एड्स या दुर्धर आजाराबाबत गैरसमज-भीती याबाबत शास्त्रीय व मूलभूत माहितीची जाणीवजागृती व्हावी या उद्देशाने शासकीय अधिकाऱ्यांनी स्वखर्चाने परिसरातील भिंती बोलक्या करीत फलक लेखनासह विविध उपक्रम राबविले आहे. राष्ट्रीय युवादिन पंधरवड्याचे औचित्य साधून तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावर व सौजन्याने भिंती फलक रंगविण्याचे आवाहन समुपदेशक विलास बोडके यांनी केले.
दत्ता दिघोळे ।
नायगाव : एचआयव्ही एड्स या दुर्धर आजाराबाबत गैरसमज-भीती याबाबत शास्त्रीय व मूलभूत माहितीची जाणीवजागृती व्हावी या उद्देशाने शासकीय अधिकाऱ्यांनी स्वखर्चाने परिसरातील भिंती बोलक्या करीत फलक लेखनासह विविध उपक्रम राबविले आहे.
राष्ट्रीय युवादिन पंधरवड्याचे औचित्य साधून तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावर व सौजन्याने भिंती फलक रंगविण्याचे आवाहन समुपदेशक विलास बोडके यांनी केले.
एचआयव्ही एड्सला समूळ नष्ट करण्यासाठी दोडी ग्रामीण रुग्णालय व ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यात गटविकास अधिकारी डॉ. लता गायकवाड व डॉ. शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती उपक्र म राबविण्यात येत आहे.
आपली कृषी आधारित अर्थव्यवस्था जगात शाश्वत विकास धोरणांतर्गत मूलभूत घटकांसोबत आरोग्य हा महत्त्वपूर्ण व मूलभूत अधिकार असल्याने यावरदेखील एक महत्त्वपूर्ण उत्तम नियोजन आयोजन करून ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक बंधू-भगिनी यांनी बावन्न टक्क्यांपेक्षा जास्त ग्रामपंचायतींमध्ये एचआयव्ही तपासणी कुठे कराल हे भिंती फलक दर्शनी भागात रंगवून राज्याला एचआयव्हीमुक्तीकडे नेण्यासाठी उत्तर महाराष्ट्रात पाऊल उचलले आहे. तालुक्यातील सार्वजनिक कामांवर आलेल्या साधनांवर एचआयव्ही एड्स मदतवाहिनी क्र मांक १०९७ ची स्टिकर स्व-खर्चाने छापून चिटकविले. या माध्यमातून जाणीवजागृती होऊन सामाजिकदायित्व निभावले. तसेच २०१८ मध्ये शिंदे टोल प्लाझावर टोल पावतीवरदेखील १०९७ हा क्र मांक महाराष्ट्रात सुरुवात होऊन आठ जिल्ह्यांनीदेखील सुरु वात केली.
कलंक व भेदभाव समाज स्वीकृती, सामाजिक, नैतिक जबाबदारी व बांधिलकी याची उत्तम खूणगाठ बांधून ठेवण्याकरिता हा प्रयत्न होता. समाजाचे आपण काही देणे लागतो या उद्देशाने हे काम हाती घेतले. तालुक्यातील प्रत्येक गावातील भिंती बोलक्या करून जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.
- विलास बोडके,
समुपदेशक दोडी, ग्रामीण रुग्णालय