फांद्या, पाला पाचोळा उचलण्यासाठी विशेष घंटागाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 09:45 PM2020-08-27T21:45:34+5:302020-08-28T00:37:27+5:30
नाशिक : सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने कॉलोनी, सोसायटीच्या आवारातील झाडे, झुडुपे वाढू लागली असून, नागरिकांकडून ती कापून रस्त्याच्या कडेला टाकली जात आहे,
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने कॉलोनी, सोसायटीच्या आवारातील झाडे, झुडुपे वाढू लागली असून, नागरिकांकडून ती कापून रस्त्याच्या कडेला टाकली जात आहे,
त्यामुळे डासांचे प्रमाण वाढून विद्रुपीकरण होत असल्याने महापालिकेने या पुढे आठवड्यातून एक दिवस प्रत्येक प्रभागातून
विशेष घंटागाडी फिरविण्याचा निर्णय घेतला आहे. झाडाच्या फांद्या, गवत, पाला पाचोळा या घंटागाडीच्या माध्यमातून उचलला जाणार आहे.
नाशिक महापालिकेच्या वतीने प्रत्येक नागरिकांच्या घरातील कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी सुरू केली आहे, प्रत्येक प्रभागात, गल्ली बोळात जाऊन ओला व सुका कचरा गोळा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न सुटला तसेच दुर्गंधी, डासांचे प्रमाण कमी झाले, त्याचबरोबर शहर सुंदर झाले आहे. कचऱ्याच्या विलीगिकरणातून प्रक्रिया करून खत प्रकल्प देखिल कार्यरत आहे. घरातील ओला, सुका कचरा घंटागाडीच्या माध्यमातून गोळा केला जात असला तरीही झाडांपासून तयार होणाºया कचºयाचा प्रश्न कायम आहे. पावसाळ्यात वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी वीज कर्मचाऱ्यांकडून विजेच्या ताराना अडथळा ठरू पाहणारे झाडाच्या फांद्या तोडण्यात येतात, त्या रस्त्याच्या कडेला तशेच टाकून दिलेल्या असतात. या शिवाय बंगले, उद्यान, सोसायटी, कॉलोनी परिसरातील झाडे, झुडुप्यांची कटाई करून नागरिकांकडून रस्त्यावर अथवा सोसायटीच्या बाहेर टाकून दिले जाते. घंटागाडी कर्मचारी ते उचलण्यास नकार देतात परिणामी या कचºयामुळे आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे, त्याचा विचार करून महापालिकेने आता विशेष घंटागाडी फक्त झाडा पासून तयार होणारा कचरा उचलण्यासाठी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी घोषणा प्रभागात फिरणाºया घंटागाडीच्या ध्वनी क्षेपकावरून केली जात आहे. या विशेष घंटागाडीतच नागरिकांनी झाडाच्या फांद्या, नारळाच्या फांद्या, गावात, झुडुपे टाकावे असे आवाहन केले जात आहे. मात्र आठवड्यातून कोणत्या दिवशी ही घंटागाडी येईल याचा उलगडा केला जात नाही.