मद्यपी वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहीम : नांगरे-पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 01:25 AM2019-06-14T01:25:51+5:302019-06-14T01:26:55+5:30
शहरात मद्यप्राशन करून सर्रासपणे वाहन चालविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, यामुळे रस्ते अपघातांमध्येही वाढ होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे मद्यपी वाहनचालकांविरुद्ध आता विशेष मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नाशिक : शहरात मद्यप्राशन करून सर्रासपणे वाहन चालविणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, यामुळे रस्ते अपघातांमध्येही वाढ होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे मद्यपी वाहनचालकांविरुद्ध आता विशेष मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्यांना पोलिसांकडून दणका दिला जाणार आहे. शहर वाहतूक शाखेकडे यापूर्वी केवळ चार ब्रेथ अॅनालायझरद्वारे तपासणी केली जात होती, मात्र आता या यंत्राची संख्या थेट ५० झाली आहे. त्यामुळे मिशन आॅल आउट, कॉम्बिंग आॅपरेशनसह विशेष नाकाबंदी पॉइंट उभारून मद्यपी वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना नांगरे-पाटील यांनी दिल्या आहेत. मागील दोन दिवसांपासून शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत मिशन आॅल आउट मोहीम राबविली जात आहे. या मोहिमेअंतर्गत मंगळवारी एकूण ६६ मद्यपी वाहनचालकांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली आहे. ही कारवाई अशीच पुढे सुरू राहणार असल्याचे नांगरे-पाटील म्हणाले.
दरम्यान, मिशन आॅल आउटमध्ये २५०पेक्षा अधिक गुन्हेगार, टवाळखोरांवर कारवाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे गुरु वारी (दि.१३) रात्री पुन्हा ९ ते ११ या वेळेत आॅपरेशन आॅल आउट मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत ११६ पैकी ९३ गुन्हेगारांवर कारवाई क रण्यात आली. तसेच तडीपार केलेले असतानाही शहरात वास्तव्य करणाºया दिगंबर किशोर वाघ, वीरेंद्र यशपाल शर्मा या दोघांना शहरातून अटक करण्यात आली. तसेच फरार असलेल्या १९ पैकी एका संशयिताला अटक केली.