अवैध धंद्याविरोधात विशेष मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 01:44 AM2018-12-16T01:44:17+5:302018-12-16T01:44:35+5:30
जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता मागील महिन्यापासून विशेष मोहीम सुरू असून, अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी उपविभागीय स्तर तसेच पोलीस ठाणेनिहाय पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच जिल्हास्तरावर स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पथकांद्वारे धडक कारवाई सुरू आहे.
नाशिक : जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे वाढते प्रमाण लक्षात घेता मागील महिन्यापासून विशेष मोहीम सुरू असून, अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी उपविभागीय स्तर तसेच पोलीस ठाणेनिहाय पथके तयार करण्यात आली आहेत. तसेच जिल्हास्तरावर स्थानिक गुन्हे शाखा व विशेष पथकांद्वारे धडक कारवाई सुरू आहे.
जिल्ह्यात अवैधरीत्या मद्याची विक्री व वाहतूक करणारे, हातभट्टीची गावठी दारू तयार करणारे, अंक आकडे तसेच पत्त्यांवर पैसे लावून अवैधरीत्या मटका व जुगार खेळणारे व खेळविणाऱ्या इसमांविरुद्ध धडक कारवाई करण्यात येत आहे. तसेच जिल्ह्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील हॉटेल-ढाबे, गावपातळीवरील अवैधरीत्या चालणारे दारूचे अवैध धंदे चालणारे ठिकाणांची माहिती घेऊन छापे टाकण्यात येत आहे. जिल्ह्यातील महामार्गावर होणारी अवैध वाहतूक तसेच बेशिस्त वाहनचालकांवरही जिल्हा वाहतूक शाखा तसेच वाहतूक पोलिसांच्या मार्फतीने कारवाई चालू आहे.
जिल्ह्यातील या विशेष मोहिमेत अवैध मद्यविक्री व वाहतूक करणारे तसेच हातभट्टीची गावठी दारू तयार करणाºया एकूण ५६० इसमांवर दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करण्यात आली व त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सदर कारवाईत सुमारे ३१ लाख ३८ हजार ७०३ रुपयांचा अवैध मद्यसाठा, हातभट्टीची गावठी दारू व अन्य साहित्य जप्त करण्यात आली आहे. मुंबई जुगारबंदी कायद्यान्वये एकूण १०८ केसेस करण्यात आल्या असून सुमारे १५० जुगारी इसमांना अटक करण्यात आली आहे. सदर कारवाईत जुगाराचे साहित्य साधने व रोख रक्कम असा एकूण ११ लाख ३७ हजार ९०९ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
बेशिस्त वाहनचालकांकडून १५ लाखांचा दंड
च्जिल्हा वाहतूक नियंत्रण शाखा, शहर वाहतूक शाखा मालेगाव तसेच पोलीस ठाणेनिहाय वाहतूक पोलिसांनी सदर मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन विनाहेल्मेट व सीटबेल्ट, मोबाइलवर बोलणारे चालक, नो पार्किंग झोन, ड्रंक अॅण्ड ड्राइव्ह, अवैध वाहतूक तसेच भरधाव वाहन चालविणाºया इसमांवर ७५५७ केसेस दाखल केल्या व त्यांच्याकडून १५ लाख २० हजार ८०० रु. चा दंड वसूल करण्यात आला. त्याचप्रमाणे प्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस दलातर्फे करण्यात आलेल्या संयुक्त कारवाईत २८४२ केसेस करण्यात येऊन ६९ वाहने जप्त करण्यात आली असून, २५ वाहन चालकांचे परवाने रद्द करण्यात आले. तसेच ३० वाहनांचे निलंबन प्रस्ताव सादर करण्यात आले आहे.