नांदूरशिंगोटेत आरोग्य विभागातर्फे विशेष मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2020 10:57 PM2020-09-21T22:57:23+5:302020-09-22T00:59:45+5:30
नांदूरशिंगोटे : येथे आरोग्य विभागाच्या वतीने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
नांदूरशिंगोटे : येथे आरोग्य विभागाच्या वतीने ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, सरपंच गोपाल शेळके, दीपक बर्के, उपसरपंच नानासाहेब शेळके आदींसह आरोग्य विभागाच्या समुदाय आरोग्य अधिकारी प्रणाली दिघे, आरोग्यसेवक ए. बी. गांगुर्डे, आरोग्य कर्मचारी व आशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या. यावेळी डॉ. दिघे यांनी या मोहिमेसंदर्भात माहिती दिली.
या मोहिमेद्वारे परिसरातील प्रत्येक कुटुंबातील सर्व सदस्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य अनिल शेळके, निवृत्ती शेळके, संतोष सानप, रामदास सानप, विकास सूर्यवंशी, ऋषिकेश सानप उपस्थित होते.