आदिवासींसाठी विशेष प्रयत्न गरजेचे : सोनवणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:17 AM2021-08-12T04:17:42+5:302021-08-12T04:17:42+5:30
तालुक्यातील महालखेडा चांदवड येथे आयोजित जागतिक आदिवासी गौरवदिन कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. सोनवणे बोलत होते. प्रारंभी भगवान एकलव्य, ...
तालुक्यातील महालखेडा चांदवड येथे आयोजित जागतिक आदिवासी गौरवदिन कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून प्रा. सोनवणे बोलत होते. प्रारंभी भगवान एकलव्य, राघोजी भांगरे, बिरसा मुंडा, माता शबरी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
जल, जमीन, जंगल हे जपले जातील तसेच आदिवासी शिकला पाहिजे. स्पर्धात्मक युगात शिक्षण ही काळाची गरज बनली आहे. शिकलेले मस्तक कोणापुढे नतमस्तक होत नाही, तर शिक्षणाने चांगले काय आणि वाईट काय हे कळते. अंधश्रध्दा दूर सारून विज्ञानाची कास धरा, असे आवाहनही यावेळी प्रा. सोनवणे यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे तालुकाध्यक्ष शांताराम पवार यांनी केले. यावेळी सरपंच पुंडलिक होडे, उपसरपंच रमेश माळी, राजेंद्र पिंपळे, परसराम ठाकरे, संतोष निकम, मारुती मोरे, उत्तम पवार, संजय मोरे, रंगनाथ लोखंडे, बापू मोरे, अण्णा राजोळे, मच्छिंद्र मोरे, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष शोभा ठाकरे, ज्ञानेश्वर माळी, शिवाजी खांडेकर देवराम खुरसने उपस्थित होते.