नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय आता एका क्लिकवर
By Admin | Published: April 11, 2017 10:22 PM2017-04-11T22:22:49+5:302017-04-11T22:22:49+5:30
विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय
नाशिक : विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयाचा इतिहास असो वा पोलीस ठाणे, अधिकाऱ्यांचा फोन नंबर याबरोबरच नागरिकांना आपल्या तक्रारी वा सूचना थेट विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे करण्यासाठी एक समर्थ पर्याय एका क्लिकसरशी उपलब्ध करून देण्यात आला आहे़ नाशिक विभागात दाखल गुन्ह्यांसह विविध प्रकारची माहिती असलेले ्रॅस्रल्लं२ँ्र‘.ङ्म१ॅ हे संकेतस्थळ तयार करण्यात आले असून, विशेष पोलीस महानिरीक्षक विनयकुमार चौबे यांच्या हस्ते मंगळवारी (दि़११) या संकेतस्थळाचे उद्घाटन झाले़
विशेष पोलीस महानिरीक्षकांचे कार्यालय गडकरी चौकात असून, राज्यातील सर्वांत संवेदनशील विभाग म्हणून नाशिक विभागाची ओळख आहे़ त्यामध्ये धुळे, अहमदनगर, जळगाव या जिल्ह्यांवर पोलिसांना अधिक लक्ष द्यावे लागते़ महानिरीक्षक कार्यालयाने तयार केलेल्या संकेतस्थळामध्ये नागरिकांची सुरक्षितता, बँक व्यवहार, सुरक्षा, नागरिकांची सनद, कर्तव्य, हक्क याची माहिती देण्यात आली आहे़ याबरोबरच पोलीस कर्मचाऱ्यांसाठीही त्यांचे कर्तव्य, सेवा अधिकार नियम, विविध कायदे यांच्या अपडेट माहितीचा समावेश आहे़
या संकेतस्थळामध्ये पाचही जिल्ह्यांतील नागरिकांना स्थानिक पोलिसांबाबत काही तक्रारी, अवैध धंदे सुरू असल्यास त्याची माहिती या संकेतस्थळावर देता येणार आहे़ यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा यांची बचत होऊन आलेल्या तक्रारींवर त्वरित कार्यवाही केली जाणार आहे़ याबरोबरच पारपत्र, चारित्र्य पडताळणी व विविध अधिकृत शासकीय संकेतस्थळांच्या लिंकही यावर देण्यात आल्या आहेत़ या संकेतस्थळासाठी पोलीस उपअधीक्षक अरुंधती राणे, विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक शैलेश जाधव, सहायक पोलीस निरीक्षक सुरेश मनोरे, कार्यालय अधीक्षक विजय मुदकोंडवार, अरुण शेलकर, सूरज अलग, संजय बोडके, मनिष धारणकर, बापू सपकाळ, वाल्मीक सोनवणे यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत़