नाकाबंदीला विशेष पोलीस महानिरीक्षकांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 10:04 PM2020-06-08T22:04:28+5:302020-06-08T23:55:10+5:30
सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील नाशिक जिल्हा सीमेवर विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी भेट दिली. नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांनी नाशिक जिल्हा पाथरे सीमेवरील नाकाबंदीला भेट देऊन पाहणी केली.
पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथील नाशिक जिल्हा सीमेवर विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी भेट दिली.
नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांनी नाशिक जिल्हा पाथरे सीमेवरील नाकाबंदीला भेट देऊन पाहणी केली. या भेटीदरम्यान दोरजे यांनी या ठिकाणांची तपासणीही केली. जिल्हा सीमा तपासणी, कार्यरत कर्मचाऱ्यांची, शिक्षकांची वेळोवेळी काळजी घेतली जाते का, प्रवाशांची तपासणी, याबद्दल त्यांनी विचारणा केली.
काही दिवसापूर्वी या ठिकाणी आयशर ट्रकने धडक दिल्याने एका शिक्षकाचा अपघात झाला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिक्षकांचीही चौकशी केली आणि आरोग्याची काळजी घ्यावी असे सांगितले. यावेळी झालेल्या अपघातात पाथरे येथील चेक पोस्ट पूर्णपणे उध्वस्त झाला होता. पोलीस कर्मचारी, शिक्षक या अपघातात बचावले होते.
वावी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गलांडे, नाशिक, नगर, वावी येथील
पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते. येथील चेकपोस्टचे काम सुरू आहे. यावेळी आजूबाजूच्या ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना त्रास होत नाही ना तसेच सहकार्याची भावना ठेवली जाते आहे का, याची शहानिशा करण्यात आली. पाथरे गावातील तरुण, पोलीस कर्मचारी यांनी परिसराची स्वच्छता केली. रस्त्यावरील बॅरिकेड्सला रिफ्लेक्टर लावण्यात आले. मास्क, सॅनिटायझर, साबण याचा सतत वापर करण्याचा सल्ला पोलीस अधीक्षकांनी नाशिक आणि अहमदनगरच्या पोलीस कर्मचाºयांना दिला.