माहेश्वरी सभेतर्फे विशिष्ट व्यक्ती मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:19 AM2019-07-14T00:19:06+5:302019-07-14T00:33:29+5:30
महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्हा माहेश्वरी सभा यांच्या वतीने नवीन आडगाव नाका येथील श्री स्वामी नारायण मंदिरात शनिवारी (दि.१३) शहरात विशिष्ट व्यक्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाज बांधवांनी मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
पंचवटी : महाराष्ट्र प्रदेश माहेश्वरी सभेच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्हा माहेश्वरी सभा यांच्या वतीने नवीन आडगाव नाका येथील श्री स्वामी नारायण मंदिरात शनिवारी (दि.१३) शहरात विशिष्ट व्यक्ती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी समाज बांधवांनी मेळाव्यासाठी मोठ्या संख्येने हजेरी लावली.
श्रीमती के. एन. केलानगर येथे संपन्न झालेल्या विशिष्ट व्यक्ती मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय अध्यक्ष कल्पना गगराणी, आमदार जयप्रकाश मुंदडा, सुरेश काकाणी, संघटन मंत्री अजय काबरा, सतीश सोनी, अशोक बंग, सतीश चरखा आदींसह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल भारतीय माहेश्वरी महासभेचे सभापती श्यामसुंदर सोनी होते. शनिवारी सकाळी विवाह समस्या चिंतन, मन की बात आणि त्यानंतर दुपारी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला. रात्री समुपदेशन कार्यक्र म झाला. यावेळी सोनी, शैलेश मालू, शोभादेवी सोमाणी,
संजय दहाड, प्रा. गगराणी आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी श्रीनिवास मुंदडा, रवींद्र आगीवाल, राजेंद्र मुंदडा, लीलाधर राठी, विजय केला, केदार मालपाणी, कल्पेश हेडा, हिरालाल डागा, रामेश्वर सोनी, नवनीत तापडिया, गुणवंत मणियार, गोकुळ तापडिया आदींसह मान्यवर तसेच समाजबांधव उपस्थित होते. सूत्रसंचालन संतोष जाजू यांनी केले.
पहिलाच कार्यक्रम
माहेश्वरी समाजाच्या भवितव्यासाठी विशिष्ट परिचय मेळाव्याचे आयोजन केले होते. समाजात विधवा, विधुर व घटस्फोटितांच्या भवितव्यासाठी अखिल भारतीय स्तरावर माहेश्वरी समाजाचा पहिला कार्यक्रम या निमित्ताने आयोजित केला होता. याशिवाय समाजातील ज्या युवक-युवतींचा विवाह झालेला नाही त्यांचादेखील परिचय संपन्न झाला. समाजातील काही विधवा, विधुर व घटस्फोटित असलेल्यांचे पुढील आयुष्य व्यवस्थित जावे यासाठीच मेळाव्याचे आयोजन केल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगितले.