खातेवाटपासाठी विशेष सभेची तयारी

By admin | Published: October 8, 2014 12:45 AM2014-10-08T00:45:26+5:302014-10-08T00:48:54+5:30

खातेवाटपासाठी विशेष सभेची तयारी

Special meeting preparation for the account | खातेवाटपासाठी विशेष सभेची तयारी

खातेवाटपासाठी विशेष सभेची तयारी

Next

 नाशिक : विषय समिती सभापतिपदांसाठी ४ आॅक्टोबरला निवडणूक झाल्यानंतर तेव्हापासून पंधरा दिवसांच्या आत विषय समित्यांचे खातेवाटप करणे आवश्यक असल्याने जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने त्यादृष्टीने विशेष सभा घेण्याबाबत तयारी सुरू केली आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक २१ सप्टेंबरला झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत विषय समिती सभेचे नियोजन करणे जिल्हा परिषद अधिनियमान्वये आवश्यक होते. त्यानुसार ४ आॅक्टोबरला प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवून विशेष सभा घ्यावी व विषय समित्यांचे वाटप करावे, अशी विनंती केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी ४ आॅक्टोबरला विषय समिती सभापतिपदांसाठी निवडणूक जाहीर केली होती. या दोन्ही निवडणुकांसाठी पीठासन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली होती. आता ४ आॅक्टोबरला विषय समिती सभापतिपदांसाठी निवडणूक झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत या समित्यांचे वाटप होणे नियमानुसार आवश्यक आहे. त्यानुसार आता प्रशासनाने १६ आॅक्टोबरच्या आसपास तारीख निश्चित केल्याचे समजते; मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तसा प्रस्ताव पाठविला नसल्याचे कळते. (प्रतिनिधी)

Web Title: Special meeting preparation for the account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.