पाणी करारासाठी पुन्हा विशेष आॅनलाइन महासभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 10:19 PM2020-06-02T22:19:37+5:302020-06-03T00:08:09+5:30
नाशिक : महापालिकेच्या वतीने शुक्रवारी (दि. २९) पहिल्या आॅनलाइन महासभेचा प्रयोग यशस्वी ठरला असला तरी त्यासाठी अत्यंत मर्यादित कालावधी होता. त्यामुळे केवळ अंदाजपत्रकीय सभाच होऊ शकली. त्यामुळे आता गेल्या आठ वर्षांपासून रखडलेल्या जलसंपदा विभागाच्या पाणी करारासंदर्भात नव्याने विशेष महासभा घेण्याचे नियोजन सुरू झाले आहे. तसे सुतोवाच महापौर सतीश कुलकर्णी यांनी केले आहे.

शहराला गंगापूर, दारणा आणि मुकणे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यासाठी जलसंपदा विभागाशी वार्षिक करार करणे आवश्यक असते. गेल्या आठ वर्षांपासून अशाप्रकारचा करारच झालेला नाही. जलसंपदा विभागाने दीडशे कोटी रुपयांची केलेली मागणी नंतर कमी केली असली तरी अनेक प्रकारच्या मागणीबाबत महापालिका आणि जलसंपदा विभागात मतभेद आहेत. माजी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी वादावर शासकीय स्तरावर तोडगा काढण्यात येईल, असे सांगून करार करण्याचे निर्देश नाशिक येथेचे एका बैठकीत दिले असले तरी त्यानंतर महासभेत विविध कारणांनी पाचवेळा कराराचा मसुदा संमत करण्याचा प्रस्ताव तहकूब करण्यात आला आहे. यंदा महापौरांनी दोन सभा आॅनलाइन घेण्याची तयारी केली होती. मात्र, ते शक्य झाले नाही त्यामुळे पाणी कराराचा प्रस्ताव पाचव्यांदा तहकूब झाला आहे. आता या विषयासाठी स्वतंत्र महासभा सात ते आठ दिवसांत बोलविण्यात येईल, असे महापौर कुलकर्णी यांनी सांगितले.
----------------------------
४ आॅनलाइन महासभेच्या तांत्रिक मर्यादेमुळे महापालिकेच्या वतीने सीबीएसई बोर्डाच्या शाळा सुरू करणे, गेल्या सिंहस्थातील १७ कोटी रुपयांच्या ज्यादा खर्चाला मान्यता देणे, अधिकारी-कर्मचाऱ्यांना मुदतपूर्व निवृत्ती देणे, वृक्षगणनेसाठी चार कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च, शहर अभियंत्यासह अन्य अधिकाऱ्यांची सेवानिवृत्ती आदी विषय तहकूब करण्यात आले आहेत.