विशेष शिक्षकांचे धरणे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 11:59 PM2017-09-23T23:59:08+5:302017-09-24T00:26:35+5:30

: दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकविणारे विशेष शिक्षक व परिचर यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालय येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.

 Special teachers protest movement | विशेष शिक्षकांचे धरणे आंदोलन

विशेष शिक्षकांचे धरणे आंदोलन

Next

नाशिकरोड : दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकविणारे विशेष शिक्षक व परिचर यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालय येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे.  दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी नाशिक विभागांत सुमारे ५०० व नाशिक जिल्ह्यात १२० विशेष शिक्षक आहेत. राज्यात केंद्र शासन पुरस्कृत अपंग समावेशित शिक्षण योजना केंद्र शासनाच्या १३ एप्रिल व ३१ आॅगस्ट २००९ च्या परिपत्रकानुसार सुरू करण्यात आली. या योजने अंतर्गत राज्यात ११८५ विशेष शिक्षक व ७२ परिचर यांची सामान्य शिक्षकांच्या  सेवा शर्तीनुसार नियुक्ती करण्यात आली.
२७ जुलै २०१५ च्या शासन परिपत्रकानुसार ११८५ विशेष शिक्षक व परिचर यांना कुठलेही कारण नसताना सेवा समाप्त करण्यात आली. या निर्णयाविरोधात विशेष शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली होती.  औरंगाबाद खंडपीठाने विशेष शिक्षक व परिचर यांचे थकीत वेदन अदा करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच विशेष शिक्षक व परिचर यांना पुनर्स्थापित करण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांनीदेखील शिक्षण विभागाला न्यायालयाच्या निर्णयाचे अनुपालन करण्याची सूचना केली.  धरणे आंदोलनामध्ये मिलिंद साळवे, सागर मेढे, हेमंत पगार, योगेश शिंदे, प्रल्हाद धांडे, योगेश पवार, मनोज निकम, ब्रिजलाल कांदळकर, सोनाली धोंडगे, रत्नमाला परदेशी, प्राजक्ता वाघ, पूनम देवरे आदी सहभागी झाले आहेत.
थकीत वेतनाची मागणी
अद्यापपर्यंत कर्मचाºयांना पुनर्स्थापित व थकीत वेतन दिलेले नाही. औरंगाबाद उच्च न्यायालय खंडपीठाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात यावी, विशेष शिक्षकांना शिक्षण संचालक यांच्या प्रस्तावानुसार अतिरिक्त ठरवून तत्काळ समायोजन करण्यात यावे, थकीत वेतन देण्यात यावे या मागणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर गुरुवारपासून दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकविणाºया विशेष शिक्षक व परिचर यांनी धरणे आंदोलनास सुरुवात केली आहे.

Web Title:  Special teachers protest movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.