साईनगर शिर्डी ते सिकंदराबाददरम्यान विशेष गाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:41 AM2020-12-04T04:41:24+5:302020-12-04T04:41:24+5:30
मनमाड : रेल्वे प्रशासनातर्फे साईनगर शिर्डी ते काकीनाडा पोर्ट आणि साईनगर शिर्डी ते सिकंदराबाददरम्यान विशेष गाडी चालवण्यात ...
मनमाड : रेल्वे प्रशासनातर्फे साईनगर शिर्डी ते काकीनाडा पोर्ट आणि साईनगर शिर्डी ते सिकंदराबाददरम्यान विशेष गाडी चालवण्यात येणार आहे. या गाड्या संपूर्णतः आरक्षित राहणार असून, दोन्ही गाड्यांना मनमाड रेल्वेस्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
गाडी क्रमांक ०७२०५ डाऊन साईनगर शिर्डी ते काकीनाडा पोर्ट ही गाडी दिनांक ६ डिसेंबरपासून ते पुढील आदेशापर्यंत दर मंगळवार, गुरुवार, रविवारी १७.२० वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी काकीनाडा पोर्टला १९.४५ वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक ०७२०६ अप काकीनाडा पोर्ट ते साईनगर शिर्डी विशेष गाडी ही दि. ५ डिसेंबरपासून ते पुढील आदेशापर्यंत दर सोमवार, बुधवार, शनिवारी ६.०० वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी साईनगर शिर्डी स्टेशनवर ९.१० वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक ०७००१ डाऊन साईनगर शिर्डी ते सिकंदराबाद ही गाडी दि. ५ डिसेंबरपासून ते पुढील आदेशापर्यंत दर सोमवार, शनिवारी १७.२० वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी सिकंदराबादला ८.५५ वाजता पोहोचेल.
गाडी क्रमांक ०७००२ अप सिकंदराबाद ते साईनगर शिर्डी विशेष गाडी ही दि. ४ डिसेंबरपासून ते पुढील आदेशापर्यंत दर शुक्रवार, रविवारी १६.२५ वाजता रवाना होईल आणि दुसऱ्या दिवशी साईनगर शिर्डी स्टेशनवर ९.१० वाजता पोहोचेल. केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.