होळीसाठी रेल्वेच्या विशेष गाड्या धावणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 01:36 AM2019-03-19T01:36:01+5:302019-03-19T01:36:19+5:30
होळी सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने काही जादा गाड्यांचे नियोजन केले असून, काही विशेष गाड्यांदेखील या कालावधीत धावणार आहेत
नाशिकरोड : होळी सणाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने काही जादा गाड्यांचे नियोजन केले असून, काही विशेष गाड्यांदेखील या कालावधीत धावणार आहेत. प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेल्या विशेष गाड्यांसाठी अधिकचे शुल्कही आकारले जाणार आहे. मुंबई-पटना, वाराणसी, मंडूआडी दरम्यान या विशेष गाड्या धावतील.
मंगळवार, दि. १९ रोजी मुंबई सीएसटीवरून न वाराणसी स्पेशल ही गाडी मुंबई सीएसटी येथून पहाटे ५.१० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १२ वाजता वाराणसीला पोहचेल. परतीच्या प्रवासात हीच गाडी २० मार्चला १३.५५ वाजता वाराणसीहून प्रस्थान करून दुसऱ्या दिवशी १६.२० वाजता मुंबईला पोहोचेल. दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, भुसावळ, खांडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, माणिकपूर, इलाहाबाद येथे असे या गाडीला थांबे देण्यात आले आहेत.
मुंबई सीएसटीहून पटना सुपरफास्ट स्पेशल एक्स्प्रेस २२ मार्चला १४.२० वाजता निघेल, तर दुसºया दिवशी १८.३० वाजता पटनाला पोहोचेल. परतीला हीच गाडी २३ मार्चला २३.३५ वाजता पटनाहून निघून तिसºया दिवशी १६.१५ वाजता मुंबईला पोहोचेल. दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, मानिकपूर, इलाहाबाद छियोंकी, बक्सर, आरा, दानापूर येथे गाडीला थांबा देण्यात आला आहे.
मुंबईहून मंडूआडीसाठी एसी स्पेशल गाडी २० मार्चला १२.२० वाजता निघून दुसºया दिवशी पावणेपाचला पोहोचेल. येताना ही गाडी २१ मार्चला ६.३० वाजता निघून दुसºया दिवशी ८.२० वाजता मुंबईला पोहोचेल. दादर, कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबलपूर, कटनी, सतना, मानिकपूर, इलाहाबाद, ज्ञानपूर येथे गाडी थांबणार आहे.