कोरोना विषाणुच्या यार्डातील शिरकावामुळे लासलगाव कांदा लिलावात विशेष दक्षता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 04:51 PM2020-09-30T16:51:16+5:302020-09-30T16:51:37+5:30

लासलगाव : एकीकडे कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यास सुरु वात झाली असताना दुसरीकडे कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातलेला असून या कोरोना विषाणूने आशिया खंडातील अग्रेसर असलेल्या कांद्याची बाजारपेठ लासलगाव बाजार समितीत ही शिरकाव केल्याने या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कांद्याचे मुख्य बाजार आवार असलेल्या लासलगाव येथे १ आॅक्टोंबर पासून पुढील आदेशापर्यंत सकाळच्या सत्रातच कांद्याचे लिलाव होणार आहे.

Special vigilance in Lasalgaon onion auction due to corona virus infiltration in the yard | कोरोना विषाणुच्या यार्डातील शिरकावामुळे लासलगाव कांदा लिलावात विशेष दक्षता

कोरोना विषाणुच्या यार्डातील शिरकावामुळे लासलगाव कांदा लिलावात विशेष दक्षता

Next
ठळक मुद्देनिफाड तालुक्यात कोरोना संसर्गाची लागण झालेल्या रु ग्णात वाढ

लासलगाव : एकीकडे कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यास सुरु वात झाली असताना दुसरीकडे कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातलेला असून या कोरोना विषाणूने आशिया खंडातील अग्रेसर असलेल्या कांद्याची बाजारपेठ लासलगाव बाजार समितीत ही शिरकाव केल्याने या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कांद्याचे मुख्य बाजार आवार असलेल्या लासलगाव येथे १ आॅक्टोंबर पासून पुढील आदेशापर्यंत सकाळच्या सत्रातच कांद्याचे लिलाव होणार आहे.
निफाड तालुक्यात कोरोना संसर्गाची लागण झालेल्या रु ग्णात वाढ होत आहे. लासलगाव बाजार समितीच्या विंचूर उपबाजार आवारातील कांदा लिलाव पुकारणाºया व्यापारी, मदतनीसला कोरोना संसर्ग झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाला तर बाजार समितीच्या तिघे कर्मचाऱ्यांना व कांदा निर्यातदार व्यापार्याला कोरोनाची लागण झाल्याने कांदा व्यापाºयांसह कर्मचाºयांचे धाबे दणाणले आहे. लासलगाव बाजार समितीत दोन सत्रात कांद्याचे लिलाव होत होते, मात्र कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सकाळी साडे आठ वाजेपासून कांदा आलेल्या वाहनातील लिलाव संपेपर्यंत कांद्याचे लिलाव सुरू ठेवण्याची मागणी व्यापाºयांनी केली असता या मागणीचा विचार करत बाजार समिती प्रशासनाने १आॅक्टोंबर पासून पुढील आदेशापर्यंत सकाळच्या सत्रात कांद्याचे लिलाव घेण्याचा निर्णय घेतला त्यामुळे शेतकºयांनी आपल्या जवळील कांदा हा लिलावासाठी सकाळच्या सत्रात आणावा असे आवाहन लासलगाव बाजार समितीच्या सभापती सुवर्णा जगताप व सचिव नरेंद्र वाढवणे यांनी केले आहे. 

Web Title: Special vigilance in Lasalgaon onion auction due to corona virus infiltration in the yard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.