उमराणे ग्रा.पं.वर रामेश्वर पॅनलचा वरचष्मा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 01:46 AM2021-03-13T01:46:12+5:302021-03-13T01:46:34+5:30
सरपंचपदासाठी २ कोटी ५ लाख रुपयांची बोली लावण्याच्या घटनेने चर्चेत आलेल्या उमराणे ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी (दि.१२) घेण्यात आलेल्या निवडणुकीत रामेश्वर ग्रामविकास पॅनलने १६ जागांवर विजय मिळवत सत्ताधारी ग्यानदेव दादा देवरे पॅनलचा दारुण पराभव केला आहे. देवरे पॅनलला एकमेव जागा मिळविता आली.
उमराणे : सरपंचपदासाठी २ कोटी ५ लाख रुपयांची बोली लावण्याच्या घटनेने चर्चेत आलेल्या उमराणे ग्रामपंचायतीसाठी शुक्रवारी (दि.१२) घेण्यात आलेल्या निवडणुकीत रामेश्वर ग्रामविकास पॅनलने १६ जागांवर विजय मिळवत सत्ताधारी ग्यानदेव दादा देवरे पॅनलचा दारुण पराभव केला आहे. देवरे पॅनलला एकमेव जागा मिळविता आली.
८१.९२ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत लोकशाही पद्धतीचे समर्थन केले. ८,९८४ मतदारांपैकी ७,३६० मतदारांनी मतदान केले. दोन महिन्यांपूर्वी सरपंचपदाचा लिलाव व रामेश्वरमंदिर जीर्णोद्धार याबाबत सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्याने ग्रामपंचायतीची निवडणूक प्रकाशझोतात आली होती.
कातरणी ग्रा.पं. निवडणूक शांततेत
कातरणी ग्रामपंचायत निवडणूक सदस्य लिलाव प्रकरणी प्रक्रिया रद्दबातल ठरविली होती. ६ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात होते. मतदानात प्रभाग १ मध्ये ३५५, प्रभाग २ मध्ये ४६३ तर प्रभाग ४ मध्ये ३२९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.