वटार परिसरात सोंगणीच्या कामांना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 02:50 PM2018-10-26T14:50:20+5:302018-10-26T14:50:28+5:30
वटार : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील वटार, परिसरातील खरीप हंगामातील बाजरी, मका पिकांची कापणीच्या कामांना वेग आला असून सद्या परिसरात मजूर टंचाई आणि दुपटीने वाढलेल्या मजुरीमुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
वटार : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील वटार, परिसरातील खरीप हंगामातील बाजरी, मका पिकांची कापणीच्या कामांना वेग आला असून सद्या परिसरात मजूर टंचाई आणि दुपटीने वाढलेल्या मजुरीमुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. सुरूवातीला पावसाने दिलेली ओढ दिली, नंतर रिमझिम पावसावर पेरणी केली, थोड्याफार प्रमाणात विरींच्या पाण्यावर जगविलेली पिके आता कापणीला आले आहेत. मका व बाजरी पिकांच्या उत्पादनात ५० टक्यांनी घट तर झालीच पण मक्याचे फक्त ताटचं उभे आहेत कणीस नाहीच आहे. त्यात मजूर मिळत नाहीत, मिळतात ते दुपटीने पैसे घेतात. मग कामाला लागतात. काही मजूर तर उक्त पद्धतीने कामे करतात व भरपूर पैसे कमवतात. मक्याची तर ताट उभी दिसतात, पण कणीस मात्र दिसत नाहीत दिसली तर एकदम बारीक फक्त चारा गोळा करण्यासाठी बळीराजाला दुपटीने मजुरी देऊन कामे करून घावी लागत आहेत. अशा अनेक संकटांमुळे परिसरातील शेती आणि शेतकरी पुन्हा एकदा दुहेरी संकटात सापडला आहे. परतीच्या पावसाने पाठ फिरविल्याने रब्बीची आशा धुसर दिसत आहे. उन्हाळी कांद्याच्या रोपात घट होण्याची शक्यता वाटत आहे. आजच विहिरींच्या पाण्याची पातळी खालावलेली आहे. काही शेतकऱ्यांना तर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पडला आहे. दरवर्षी कमी होत चाललेला पावसाळा याही वर्षी बळीराजाकडे पाठ फिरवल्याने खरीप पिकाची तर आशाच नाही पण रब्बीची पण आशा धुसर झाल्यासारखी वाटते. अशा अनेक संकटांमुळे परिसरातील शेती आणि शेतकरी दुहेरी संकटात सापडलेला दिसत आहे. राबराब राबणारा बळीराजा निसर्गाच्या लहरीपणामुळे आपली व्यथा कोणाकडे मांडणार. या वर्षी सुरवातीला पावसाने ओढ दिली. जुलैमध्ये थोडया पावसावर पेरणी केली. पण परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने ऐन जोमात असलेली मका बाजरी पीके वाळली फक्त चारा शिल्लक राहिला. फक्त चारा व गोळा करण्यासाठी बळीराज्याला मजुरीच्या दुपटीने दाम देऊन काम करून घ्यावे लागत आहे.