वैनतेय विद्यालयात वाचन प्रेरणा दिनी संस्कृत भाषेत विद्यार्थ्यांंनी केली भाषणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2020 06:37 PM2020-10-17T18:37:47+5:302020-10-17T18:38:16+5:30
निफाड : येथील वैनतेय विद्यालयात भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्यावर संस्कृत भाषेमध्ये भाषणे केली. शिवाय वाचन प्रेरणा दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी आॅनलाईन पद्धतीने विविध उपक्र म राबविण्यात आले.

सकाळी वाचन प्रेरणा दिनानिमित्त या विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना वॉट्सप ग्रुपवर गोष्टीच्या एका पुस्तकाची पीडीएफ पाठवण्यात आली. सदर पीडीएफ पाठवण्यात आल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपापल्या घरी या पुस्तकाचे वाचन केले आणि पुस्तकातील माहितीचा सारांश आपल्या वहीत लिहिला, आणि सदर माहिती या विद्यार्थ्यांनी मराठीच्या शिक्षकांच्या वॉट्सला पाठवली. यासाठी प्राचार्य डी. बी.वाघ, उपप्राचार्य एस. पी. गोरवे, पर्यवेक्षक बी. आर. सोनवणे, भारती लंबाते आदींनी परिश्रम घेतले.