इगतपुरी तालुक्यात भात लागवडीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 01:05 AM2018-07-05T01:05:49+5:302018-07-05T01:08:34+5:30
घोटी : भात पिकाचे आगार आणि पावसाचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने भाताच्या लागवडीला वेग आला आहे. यामुळे तालुक्यातील बळीराजा शेतकामात व्यस्त झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. तालुक्यात ९० टक्के भाताची तर अवघी दहा टक्के नागली आणि वरई पिकाची लागवड केली जाते. यातील भातवगळता इतर पिकांची लागवड पूर्ण झाली आहे.
घोटी : भात पिकाचे आगार आणि पावसाचे माहेरघर अशी ओळख असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्याने भाताच्या लागवडीला वेग आला आहे. यामुळे तालुक्यातील बळीराजा शेतकामात व्यस्त झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे. तालुक्यात ९० टक्के भाताची तर अवघी दहा टक्के नागली आणि वरई पिकाची लागवड केली जाते. यातील भातवगळता इतर पिकांची लागवड पूर्ण झाली आहे. दरम्यान, इगतपुरी तालुक्यात मागणीपेक्षा अधिक खतांचा पुरवठा झाला असल्याने तालुक्यात खताचा कुठलाही तुटवडा
नसल्याचे पंचायत समिती कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
तालुक्यात भात पिकाबरोबर माळरानावर नागली आणि वरई या पिकाची लागवड करण्यात येते. ही लागवड केवळ दहा टक्के असते, मात्र मध्यंतरी पावसाने काही दिवसासाठी विश्रांती घेतल्याने या कालखंडात या दोन्ही पिकाची लागवड पूर्ण झाली आहे.गेल्या काही वर्षांपासून इगतपुरी तालुक्यातील धरणातील मुबलक पाण्यामुळे शेतकºयांचा बागायती पिके घेण्याकडे कल आहे. यामुळे तालुक्यातील शेतकरी भातपिकाऐवजी बागायती पिके घेण्यासाठी अनेक हेक्टर क्षेत्र पडित ठेवतात. यामुळे खरिपाच्या लागवडीत काही वर्षांपासून घट झाली आहे.