पाटोदा परिसरात कोळपणीला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2020 05:55 PM2020-06-20T17:55:34+5:302020-06-20T17:56:13+5:30
पाटोदा : परिसरात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने या पावसाच्या ओलीवर शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील मका, बाजरी सोयाबीन, भुईमुग, मुग आदी पिकांची पेरणी व लागवड केली आहे. गेल्या पाच सहा दिवसांपासून परिसरात पावसानेही उघडीप दिल्याने या पिकांच्या कोळपणीच्या कामांना वेग आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

पाटोदा आणि परिसरात या वर्षी मे महिन्याच्या शेवटच्या दोन दिवसात तसेच जून महिन्याचे पहिले तीन दिवस तसेच निसर्ग वादळाच्या पावसाने हजेरी लावली. शेतकऱ्यांनी या पावसाच्या ओलीवर घाई करीत खरीप हंगामातील बाजरी, मका, सोयाबीन, भुईमुग पिकांची पेरणी, लागवड केली आहे. लागवडीनंतर एक दोन पाऊस झाल्याने पिके चांगली आली आहे. परिसरात गेल्या काही वर्षांपासून मका पिकाच्या लागवडीचे क्षेत्र मोठया प्रमाणात वाढले तर बाजरी पिकाचे क्षेत्र झपाट्याने कमी झाल्याचे दिसून येत होते. मात्र, मागील वर्षी मका पिकावर आलेल्या लष्करी अळीने शेतकरी वर्ग हवालदिल झाला होता. तर अळीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शेतकºयांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागले होते. परिणामी यावर्षी शेतकरी वर्गाने मका लागवडीसाठी हात आखडता घेतला असल्याने मका पिक लागवड क्षेत्र कमी झाले आहे.
अनेक शेतकरी हे बैलजोडीच्या सहाय्याने पिकांची कोळपणी करीत आहे. ज्या शेतकºयांकडे बैलजोडी नाही असे शेतकरी एकरी पंधराशे रु पये देऊन कोळपणी करून घेत आहे. त्यामुळे अनेक शेतकºयांना कोळपणीच्या माध्यमातून रोजगारही उपलब्ध झाला असून घरखर्चाबरोबरच शेतीसाठी भांडवल उपलब्ध होत आहे. काही शेतकºयांनी सायकलच्या टाकाऊ भागापासून कोळपणी यंत्र तयार करून त्याच्या सहाय्याने कोळपणी केली जात आहे.