बागलाण तालुक्यात कोळपणीच्या कामांना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 10:08 PM2020-07-18T22:08:28+5:302020-07-19T00:39:20+5:30
औंदाणे : बागलाण तालुक्यात पावसाने उघडीप दिल्याने पिकांच्या कोळपणीच्या कामांना वेग आला आहे. ग्रामीण भागात मान्सूनपूर्व पावसाने चांगल्याप्रमाणे हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील बाजरी, मका, सोयाबीन, भुईमूग आदी पिकांची पेरणी केली आहे.
औंदाणे : बागलाण तालुक्यात पावसाने उघडीप दिल्याने पिकांच्या कोळपणीच्या कामांना वेग आला आहे. ग्रामीण भागात मान्सूनपूर्व पावसाने चांगल्याप्रमाणे हजेरी लावल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील बाजरी, मका, सोयाबीन, भुईमूग आदी पिकांची पेरणी केली आहे. लागवडीनंतरही एक-दोन पाऊस झाल्याने पिके चांगली आली आहेत. परिसरात गेल्या काही वर्षांपासून मका पिकाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे तर बाजरीचे क्षेत्र झपाट्याने कमी झाल्याचे दिसून येत होते. मागील वर्षी मका पिकावर आलेल्या लष्करी अळीने शेतकरीवर्ग हवालदिल झाला होता. मजूरटंचाईमुळे शेतकरी कुटुंबीयांसह शेतात काम करताना दिसत आहे. परिसरात पारंपरिक बैलजोडीच्या साह्याने कोळपणी केली जाते.